वाठार किरोली / वार्ताहर :
लॉकडाऊन असल्यामुळे शाळा कॉलेजला सुट्टी आहे, मिळालेल्या सुट्टीचा वेळेचा चांगला उपयोग करीत तारगाव तालुका- कोरेगाव परिसरातील काळोशी ,मोहितेवाडी, दुर्गळवाडी येथील शिवप्रेमी युवक इतिहासाच्या पाऊलखुणा शोधत वसंतगड तालुका कराड च्या संवर्धनासाठी झटत आहेत.
काळोशी येथील युवकांनी इतिहासाच्या पाऊलखुणा नावाचा व्हाट्सअप ग्रुप तयार केला आहे .या ग्रुपच्या माध्यमातून महाराष्ट्रातील गडकोटावर होणाऱ्या दुर्गसंवर्धन कामात सहभाग घेण्याचे सर्वांनी ठरवण्यात आले. काही दिवसापूर्वी दातेगड येथे सुरू असलेल्या दुर्गसंवर्धन कामात या युवकांनी सहभाग घेतला होता .याच वेळी संवर्धनाचा ध्यास घेतलेल्या या युवकांनी तळबीड येथील स्वराज्याचे पराक्रमी सेनापती हंबीरराव मोहिते यांचे वास्तव्य असलेल्या वसंतगडाच्या संवर्धनाचे काम हाती घेतले आहे . स्वखर्चाने या युवकांनी दोन वेळा या गडावर मोहीम हातात घेतली होती. या मोहिमेअंतर्गत गडावर पडझड झालेल्या वाड्यांचे अवशेष शोधण्यात आलेत ,त्यावर वाढलेली झाडे झुडपे तोडून बाजूला करण्यात आली आहेत ,तसेच मातीचे ढिगारे उपसण्याचे हि काम या युवकांनी स्वयंस्फूर्तीने घेतले आहे. गडावर असणाऱ्या चंद्रसेन महाराज मंदिरात राहण्याची सोय होत आहे. तसेच पिण्यासाठी येथील कृष्णा तळ्यातील चवदार पाणी मिळत आहे .
या युवकांनी केलेल्या कामाची माहिती शिवप्रेमींच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी व्हाट्सअप, फेसबुक , इंस्टाग्राम ,युट्युब चॅनेल अशा सोशल मिडियाची मदत घेतली आहे परंतु हा ध्यास घेतलेल्या युवकांना आवश्यकता आहे आर्थिक मदतीची ,तसेच परिसरातील अनेक युवकांच्या श्रमशक्ती ची सातारा जिल्ह्यातिल युवकांनी आपल्या इतिहासाच्या पाऊलखुणा शोधण्यास मदत करावी असे आवाहन या ग्रुपमधील शुभम आठवे, रोहन जवळ यांनी केले आहे .तसेच ज्यांना या कामात सहभाग आर्थिक मदत करता येईल त्यांनी 96 73 76 24 68 या गुगल पे अकाउंट वर आपण दिलेल्या चांगलाच उपयोग होणार आहे असे आवाहन या युवकांनी केले आहे.

