प्रतिनिधी / सातारा
कोरोना पार्श्वभूमीवर साताऱ्यात लॉकडाऊन सुरु आहे. या लॉकडाऊनमध्ये नियमाचे उल्लंघन करणाऱ्यावर पोलिसांकडून कारवाई सुरु आहे. अशा नियम न पाळणाऱ्या नागरिकांच्यावर कारवाई करत शहर पोलिसांनी 2976 केसेस करुन एकूण 10 लाख 98 हजार 100 रुपये दंड वसूल केला.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग वाढू नये म्हणून 15 एप्रिल पासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी सातारा व पोलीस अधीक्षक सातारा यांनी वेळो वेळी केलेल्या आदेशानुसार शहरात विना मास्क फिरणे, विना कारण फिरणे, गर्दी करणे, नियमांचे उल्लंघन करणे अशा विविध कारणासाठी दंड करण्यात आले. या कारवाईत एकूण 2876 केसेस करण्यात आल्या आहेत. यात विना मास्क 2241, सोशल डिस्टनसिंग 66, नियम उल्लंघन 185, विनाकारण फिरणे 487 अश्या केसेस करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी दिली

