Tarun Bharat

सातारा : वनकर्मचाऱ्यांवर पगारविना आली उपासमारीची वेळ

गेल्या तीन महीन्यापासुनच वेतन नाही

वार्ताहर / कास

सहयाद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोयना वन्यजीव बामणोली वनपरिक्षेत्रातील शासनाच्या २० हुन अधिक वनकर्मऱ्यांना गेल्या तिन महिन्याचे वेतनच मिळाले नसुन वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांच्याकडुनही टोलवाटोलवीची उत्तरे मिळत असल्याने वन कर्मचा-यांनवर उपासमारीच वेळ आली आहे.

कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या हाताचे रोजगारच गेल्याने अनेक चाकरमान्यांनवर उपासमारीची वेळ आली असताना शासनाच्या वनकर्मचाऱ्यांनवर कामकाज करूनही गेल्या तिन महिन्यापासुन वेतनच मिळत नसल्याने उपासमारीची वेळ आल्याचे पहायला मिळत आहे याप्रकाराकडे वरीष्ठ वनआधिकारी लक्ष देणार का व ते कधी असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सहयाद्री व्याघ्र प्रकल्पातील कोयना वन्यजीव विभागाचे बामणोली वनपरिक्षेत्र हे अति दुर्गम म्हणुन ओळखले जाते या विभागातील कार्यक्षेत्र हे कोयना नदीच्या पलिकडे असुन घनदाट जंगलानी वेढलेले आहे. या जगलांत सर्व प्रकारचे वन्यप्राणी मोठया प्रमाणात असुन या परिक्षेत्रामध्ये कारगाव अंबवडे लामज म्हाळुगे शिंदी वलवण आकल्पे आरव आदी अतिदुर्गम अनेक गावांचा समावेश होतो. या गावांमध्ये आपआपल्या कार्यक्षेत्रच्या ठिकाणच्या गावांमध्ये वनकर्मचारी हे वास्तव्यास असुन यामध्ये नवीन भरतीतील अधीक कर्मचारी आहेत ते विदर्भ मराठवाडा लातुर अशा परजिल्हयातील असुन यात माहिला वनकर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

मात्र आपल्या वेतनावर अवलंबुन असणाऱ्या या वन कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या लॉकडाऊनच्या प्रसंगात गेल्या तिन महिन्यापासुन पगारच मिळाला नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असुन अनेकांवर बँकांचे कर्जही आहे. त्यांमुळे बँकांनी कर्जचे हफ्ते भरण्यासाठी तगादा लावला असुन बँकाचे व्याजही वाढत चालले असल्याचे कर्मचाऱ्यांनी दैनिक तरूण भारत प्रतिनिधीशी बोलताना सांगीतले.

एकीकडे अडचणीच्या दुर्गम विभागामध्ये काम करायचे आणी त्याच भागात वास्तव्य करायचे बाजारपेठेकडे यायचे झाल्यास लॉकडाऊच्या काळात वेळेत लॉंच किंवा वाहन मिळत नाही त्यामुळे राहत्या ठिकाणी महिनाभराची पोटगी (बाजार) साहीत्य एकदम भरावा लागतो मात्र पगारच मिळत नसल्याने साहीत्य खरेदी करायचे कशानी असा प्रश्न या वनकर्मचाऱ्यांन पुढे पडला असुन वरीष्ठ आधीकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना वारंवार विचारणा केली असता ते टोलवाटोलवीची उत्तरे देवुन ते आपली जबाबदारी झटकुन होईल की पगार एवढेच सांगत आहेत. त्यामुळे या वनकर्मचाऱ्यांनवर कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात उपासमारीची वेळ आली असल्याचे दिसुन येत असुन त्यांचे मानसिक खच्चीकरण होऊन जीवनमान विस्कळीत होत आहे.

Related Stories

शिक्षण मंडळ कराडला स्वयंपूर्ण बनवू

Patil_p

Satara Political:अभिनेते तेजपाल वाघ यांना लागलेत राजकीय डोहाळे

Abhijeet Khandekar

कासच्या जंगलात पर्यटकांना मिळणार नाईट सफारीचा आनंद

datta jadhav

साताऱ्यात अग्निशमन बंब धावू शकत नाही

datta jadhav

सातारा : शिवसेनेच्या चमको कार्यकर्त्यांकडून गृहराज्यमंत्री देसाई यांच्या नावाने दादागिरी

Archana Banage

रेशन दुकांनात रांगाच रांगा

Patil_p