सातारा / प्रतिनिधी:
दुर्गा उत्सवाच्या अनुषंगाने आज सकाळी वाई पोलिसांनी वाई शहरातून संचलन केले.हे संचलन वाईच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.शीतल जानवे व पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आले होते.या संचलनात वाईचे पोलीस आणि होमगार्ड सहभागी झाले होते.
दुर्गा उत्सवात वाई शहरात कायदा व सुव्यवस्था राखली जावी याकरिता वाई शहरातून वाई पोलिसांनी संचलन केले.यामध्ये वाई पोलीस व होम गार्ड सहभागी झाले होते. संचलनाबाबत बोलताना सहायक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे यांनी सांगितले की वाई शहरात दुर्गा उत्सव नियम पाळून शांततेत साजरा करावा, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी नागरिकांनी सनिटायझर, सोशल डिस्टनन्स ठेवावे, असे आववाहन केले.दरम्यान वाई पोलीस व मांढरदेव ग्रामस्थांनी काल रात्री कोरोनाच्या अनुषंगाने बैठक घेतली.त्यामध्ये डी. वाय. एसपी डॉ.शीतल जानवे यांनी कोरोनाच्या अनुषंगाने घ्यावयाची दक्षता सांगितली.कोचळेवाडी येथे स्ट्रायकीग फोर्स असल्याने कोणीही विनाकारण जाऊ नये असे सांगितले.पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी ही मार्गदर्शन केले.

