Tarun Bharat

सातारा विकास आघाडीचा बटरफ्लाय पाँईट सापडणार वादाच्या भोवऱयात

प्रतिनिधी/ सातारा

नगरविकास आघाडीने पोवई नाक्यावर सेल्फी पाँईट विकसीत केला. त्या पाईंटवर सेल्फी घेण्यासाठी सातारची तरुणाई दररोज गर्दी करत आहे. नगरविकास आघाडीने जसा सेल्फी पाँईट काढला तसाच पोवई नाक्यावर मरिआई कॉम्पलेक्सच्या कोपऱयावर सातारा विकास आघाडीच्या एका नगरसेवकाने चक्क व्यापाऱयाच्या आडून बटरप्लाय पॉईट विकसीत करण्याची खटपट केली आहे. हा पाँईंट विकसीत होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱयात सापडणार आहे. त्यामुळे नेत्याच्या नावाला बट्टा लागणार आहे. उच्च दाबाचा 22 केव्हीचा डीपीखाली फुलपाखरे लावल्याने तेथे युवकयुवती फोटो काढायला जाणार अन् एखाद्या विजेचा धक्का बसला तर त्यास जबाबदार कोण राहणार याचीच चर्चा शनिवारी सुरु होती.

सातारा नगरपालिकेची निवडणूक जवळ आल्याने दोन्ही आघाडय़ांतील विद्यमान नगरसेवकांबरोबरच इच्छूकांनी पायाला भिंगऱया लावून नारळ फोडण्याचा सपाटा सुरु केला आहे. त्यात पालिकेची असो किंवा खाजगी जागा दिसली की तेथे काहीतरी छोटे मोठे पाँईंट वा अन् उपक्रम सुरु करुन नेत्यांच्या हस्ते नारळ फोडण्याचा कार्यक्रम लगेच आयोजित केला जातो अन् स्वतः कौतुकाची थाप पाठीवर थोपटून घेतली जाते. असाच काहीसा प्रकार पोवई नाक्यावर सध्या मरिआई कॉम्प्लेक्सच्या लगतच सुरु आहे. या इमारतीच्या बाजूलाच असलेल्या 22 केव्ही या हाय व्होल्टेज डिपीच्या बाजूने यापूर्वी कचरा तेथीलच व्यापारी व येणारे जाणारे नागरिक टाकत होते. आता त्याच डीपीच्या परिसरात कुंपण घालून भिंती रंगवून आत फुलपाखरे बसवून बटरफ्लाय पाईंट बनवला आहे. हा पाँईंट व्यापाऱयांनी तयार केला असल्याचे सांगून एका सातारा विकास आघाडीच्या नगरसेवकाने संकल्पना राबवली गेली आहे. त्यामुळे ही संकल्पना उद्या एखाद्याच्या जीवावर बेतू शकते, अशीही चर्चा साताऱयात सुरु झाली आहे. यापूर्वी सातारा शहरात फुटका तलाव परिसरात एका युवकास लावण्यात आलेल्या फ्लेक्समुळे दुखापत झाल्याची घटना घडली होती. तोही फ्लेक्स डीपीच्या बाजूला लावलेला होता. आता तर डीपीच्या बाजूने हा पॉईंट केल्याने त्या भोवती सेल्फी काढायला तरुण तरुणी येणार. त्यामध्ये कोणाला वीजेचा धक्का बसला तर त्यास जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होवू लागला आहे.

Related Stories

गुंतवणुकीच्या आमिषाने सहा लाखांची फसवणूक

datta jadhav

जिल्ह्यात मान्सुन सक्रीय

Patil_p

कोरेगावचे वाटोळे करणाऱयांना जनता हद्दपार करणार

Patil_p

महाबळेश्वर तालुक्यात एक महिला पॉझिटिव्ह

Archana Banage

एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन युवतीचा खून

Patil_p

सातारा : दैव बलवत्तर होत म्हणून वाचला जीव…

Archana Banage