Tarun Bharat

सातारा : व्याजवाडीत चोरट्यांनी लुटला सव्वा लाखाचा ऐवज

वाई / प्रतिनिधी :

महिलेच्या गळयाला सुरा लावून बलात्काराची धमकी देत गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र, वेल आणि काणातील फुले व चौतीस मन्यांची सोन्याची माळ असा सुमारे दोन तोळे सोन्याच्या एक लाखाचा ऐवज व तेराशे रुपये रोख चार-पाच अज्ञात चोरटयांची लांबविल्याने तालुक्यात चोर्‍यांचे अमानुष सत्र पुन्हा सुरू होवून तालुक्यातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबतची तक्रार वाई पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कडेगाव ते व्याजवाडी जाणार्‍या रस्त्यावर राजेंद्र दादासोा चव्हाण (वय 35) यांच्या मालकीचे रस्त्यालगतच घर असून ते शेळी पालणाचा व्यवसाय करतात. दि. 24 रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास राजेंद्र चव्हाण हे दुसर्‍याच्या शेतात बकरी बसविण्यासाठी गेल्या चार दिवसांपासून जात होते. त्यामुळे बकर्‍यांच्या सोबत त्यांचाही मुक्काम दुसर्‍याच्या शेतामध्ये होत होता. त्यांची पत्नी आश्‍विनी चव्हाण व मुलगा जयराज चव्हाण (वय 8), मुलगी प्रिया चव्हाण (वय 6) तसेच 65 वर्षांची आई हे घरामध्ये रात्रीच्या वेळी झोपण्याठी असतात. याची माहिती अज्ञात चोरटयांनी काढलेली असावी. व बायका माणसे घरात एकटे असल्याची काणकून त्यांना लागल्याने या चार ते पाच अज्ञात चोरटयांनी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास सहा फूट लांबीच्या गजाचा वापर करून तो गज खिडकीच्या जाळीतून आतून कडी लावलेल्या दारापर्यंत नेवून हात चलाखिने ती बंद दाराची कडी काढून घरामध्ये चार ते पाच अज्ञात चोरटयांनी प्रवेश केला. 

त्यावेळी स्वयंपाक घरामध्ये झोपलेल्या अश्‍विनी चव्हाण (वय 28) यांना झोपलेल्या अवस्थेतच या चोरटयांनी आपल्या जवळील सुरा काढून थेट मानेवर ठेवला आणि त्यांच्या गळयातील सोन्याचे मणी मंगळसूत्र, कानातील फुले, वेल अशा वस्तू जबरदस्तीने काढून घेतल्या आणि त्यांना मारहाण करून बलात्कार करण्याची धमकी देत सोने व रोख रक्कमेची मागणी केली. 

स्वयंपाक घरातून या चोरटयांनी पुन्हा आपला मोर्चा प्रवेशव्दार असलेल्या खोलीकडे वळवला. त्या ठिकाणी फिर्यादिची सासू लिलाबाई जयसिंग चव्हाण (वय 60) वर्षे यांनाही सुर्‍याचा धाक दाखवित त्यांच्या गळयातील 34 सोन्याचे मनी असणारी माळ हिसकावून घेतली. दरम्यान चोरटयांनी सुमारे एक तास घरातील चिजवस्तू तपासत सोने व रोख रक्कम मिळविण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार तक्रारदार व लहानमुले भयभित होवून उघडया डोळयांनी पहात होते. त्यावेळी लहान मुले जय व प्रिया यांनी आरडा ओरडा केल्याने त्यांच्या आईला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली व पोबारा केला. जाता जाता एक मोबाईलही चोरून नेला आहे.

या घरात चोरी करण्यापूर्वी त्यांनी परिसरातील दोन घरे देखील फोडण्याचा प्रयत्न केला पण त्या घरातील माणसे जागी झाल्याने तो प्रयत्न अयशस्वी ठरला. याबाबतची तक्रार अश्‍विनी चव्हाण यांनी वाई पोलीस ठाण्यात दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच वाई पोलीस ठाण्याचे अधिकारी व एलसीबीचे पथक घटनास्थळावर दाखल झाले होते. अचानक झालेल्या या चोरीमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अधिक तपास वाई पोलीस करीत आहेत.

Related Stories

सातारा : राष्ट्रवादी कार्यालयावर अज्ञातांकडून दगड फेक

Archana Banage

सातारा : प्रतापसिंह शेती फार्ममधील उसाला लावली आग

datta jadhav

मांडव्याचा विजय डोईफोडे कास्यपदकाचा मानकरी

datta jadhav

शहरात ‘नारळफोडय़ा’ गँगचा सुळसुळाट

Patil_p

लाखोंच्या पोशिंदा बळीराजाला ओळख कोण देणार ?

Patil_p

रूई येथील ‘त्या’ बेपत्ता बहीण भावाचे मृतदेह निरा उजव्या कालव्यात सापडले

Archana Banage