Tarun Bharat

सातारा : शहरातील सर्वच शाळांचा परिसर होणार तंबाखूमुक्त

परिसरातील पानटपऱ्यांवर तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास मनाई

विशाल कदम / सातारा :

सातारा शहरातल्या सर्व खाजगी, सरकारी शाळांचा परिसर हा तंबाखूमुक्त करण्याचा निर्णय प्रशासनाच्यावतीने घेण्यात आला आहे. त्याच अनुषंगाने शहरातील सर्व शाळांच्या आवारात भिंतीवर, रस्त्यावर तंबाखूमुक्त परिसर म्हणून प्रबोधनात्मक वाक्य रंगवण्याचे काम सुरु आहे. या परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्री केल्याचे आढळून आल्यास कारवाई होणार आहे.  

तंबाखू हे व्यसन घातक आहे, असे डॉक्टर नेहमी सांगत असतात. शासनही तंबाखूचे सेवन शरिरास अपायकारक आहे, अशी जाहिरात सातत्याने करत असते. त्याच तंबाखूचे सेवन व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री शाळांच्या परिसरात करण्यात येवू नये, याकरता प्रशासनानेच तंबाखूमुक्त शाळा परिसर असा उपक्रम सुरु केला आहे. यापूर्वी जावली तालुक्यातील सर्व शाळा तंबाखुमुक्त परिसर म्हणून जाहीर झाल्या आहेत. 

सलाम फौंडेशनच्यावतीने जावली तालुक्याचा गौरवही करण्यात आला आहे. त्याच प्रमाणे आता सातारा शहरातील सर्व खाजगी आणि सरकारी शाळांचा परिसर हा तंबाखुमुक्त करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्याकरता रस्त्यावर आणि भिंतीवर प्रबोधनात्मक वाक्ये लिहिली गेली आहेत. त्यातच शाळा परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर बंदी आणली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात सातारा शहरातील शाळांच्या परिसरात तंबाखू बंदी होणार आहे.

प्रशासन अधिकाऱ्यांची धावपळ सुरू

नगरपालिका शाळांचे प्रशासन अधिकारी मारुती भांगे हे प्रामुख्याने या उपक्रमाचे नियोजन करत आहेत. त्यांच्या आदेशाने शहरातील सर्व शाळांच्या बाहेर प्रबोधनात्मक  बोर्ड लावण्यात आले आहेत. शहरातील सर्व शाळांचा परिसर तंबाखूमुक्त करण्यासाठी शिक्षण सभापती तथा उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

Related Stories

दहिवडी नगरपंचायतीला आगीत 15 लाखांचे नुकसान

Patil_p

कोसुंब येथे सापडले दुर्मीळ खवल्या मांजर

Patil_p

ओबीसी आरक्षण देण्यात सरकारचा नाकर्तेपणा

Patil_p

सातारा : शहीद जवान सोमनाथ तांगडे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

datta jadhav

कोरोना चाचणीसाठी साताऱ्यात सुविधा उपलब्ध करून देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

Archana Banage

सदरबाजारमध्ये दिवसभर तणाव

Patil_p