Tarun Bharat

सातारा शहरातील सलून झाले सुरू

सॅनिटायझर, फेसशिंल्ड वापरून केस कटिंग

प्रतिनिधी/ सातारा

राज्य सरकारने सलून व्यवसायिकाना आपला व्यवसाय करण्यास काही अटी व नियम घालून परवानगी दिली आहे.त्यानुसार सातारा शहरातील सलून व्यावसायिकांनी आपले सलून सकाळी उघडले.नियम काटेकोरपणे पाळून केस कापून देत होते.कारागीर फेसशिंल्ड आणि सॅनिटायझर वापर करून कटिंग करत होते.

लॉक डाऊन मध्ये सलून बंद ठेवण्यात आले होते.कोरोनाचा धोका असल्याने हा निर्णय राज्य शासनाने घेतला होता.राज्य सरकारच्या या निर्णयामुळे अनेक नाभिकावर उपासमारीची वेळ आली आहे.सलून सुरू व्हावेत याकरता राज्यभर आंदोलन करण्यात आले होते.वैफल्य आल्याने काही कारागीरांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत.राज्य सरकारने नुकतीच सलून सुरू करण्याचा निर्णय घेतला.रविवारी सातारा शहरातील सलून सुरू झाले.सलूनमध्ये केस कापून घेण्यासाठी ग्राहकांनी सोशल डिस्टन्स ठेवून गर्दी केली होती.

राज्य शासनाचे आभार

मार्च महिन्यापासून सलून व्यवसाय बंद होते.नाभिक समाजावर फार मोठं संकट होत.प्रथमत मी राज्य शासनाच आभार मानतो.स्वाभिमानी नाभिक संघटना वारंवार आंदोलने करून परवानगी मागत होते.त्याची दखल घेऊन राज्य शासनाने परवानगी दिली आहे.

मंगेश काशीद स्वाभिमानी नाभिक संघटना पदाधिकारी

Related Stories

जिल्हय़ात बाधित वाढ मंदावली, निर्बंधही सैल

Patil_p

महापूर ओसरतोय, महामार्ग सुरू

Archana Banage

सातारा : आता योग्य व्यक्ती “ग्रामपंचायतीचा प्रशासक”

Archana Banage

महाराष्ट्रात येत्या पाच दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता

Tousif Mujawar

इंदोलीच्या पतसंस्थेत साडेचार कोटींचा गैरव्यवहार

Patil_p

कोल्हापूर : खामकरवाडी प्रकल्प ओसंडू लागला

Archana Banage