Tarun Bharat

सातारा शहरात निसर्ग वादळाने उडाली त्रेधा

प्रतिनिधी/ सातारा

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दोन दिवसांपूर्वीच निसर्ग चक्री वादळाच्या पार्श्वभूमिवर सावधानतेचा इशारा दिला होता. त्यामुळे सातारा शहरवासीयांनी घरातून बाहेर न पडणेच पसंद केले. सकाळपासून वादळी वाऱयासह पावसाने सुरुवात केली. दुपारी दीड वाजण्याच्या दरम्यान पाऊसाचे प्रमाण वाढतच गेले. या निसर्ग वादळामध्ये जे सातारकर नागरिक बाहेर पडले त्यांची मात्र चांगलीच त्रेधा उडाली.

 रामकुंड परिसरात म्हैशीच्या शेडवर झाड पडले तर जयभवानी सर्व्हिसिंग सेंटरचे वादळात पत्रे उडून गेले. सिव्हिल रोड, अनंत इंग्लिश स्कुल परिसर, मंगळवार पेठेत झाडांच्या फांद्या पडल्याच्या घटना घडल्या. कोठेही जीवीत हानी झाली नसून नुकसान झाले नसल्याचे समजते. संपूर्ण शहराचा वीज पुरवठा बराच वेळ खंडित झाला होता तर लाईट येत जात असल्याने बराच वेळ वीजेचा लपंडाव चालू होता. कोरोनामुळे घरात असलेल्या सातारकर नागरिकांना लाईट गेल्याने व बाहेर पाऊस कोसळत असल्याने अडकून पडल्यासारखे झाले होते.

 पहाटेपासून सातारा शहरात पावसाबरोबर जोराचे वारे वाहू लागले. या वाऱयात विद्युत वाहक तारा तुटून नुकसान होऊ नये म्हणून महावितरण कंपनीने वीज पुरवठा खंडित केला होता. सदरबझारमधील रामकुंड येथील मारुती मंदिराच्या पाठीमागे प्रकाश माने यांचा म्हैशीचे शेड आहे. त्या शेडवरी शेजारीच असलेले झाड वादळी वारे आणि पावसामुळे पडले. सुदैवाने शेडमध्ये म्हैशी नसल्याने अनर्थ टळला. मात्र शेडचे किरकोळ प्रमाण नुकसान झाले. तसेच शहरात सिव्हील हॉस्पिटल रोड, अनंत इंग्लिश स्कुल परिसर व मंगळवार पेठेत झाडांच्या फांद्या पडल्या. त्याची माहिती सातारा पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागला कळताच पथकाने धाव घेत फांद्या बाजूला करुन वाहतूक सुरळीत केली.

बॉम्बे रेस्टॉरंट चौक परिसरात पत्रे उडाले

सकाळपासून वाहत असलेल्या सोसाटय़ाच्या वाऱयामुळे 11 वाजण्याच्या सुमारास शाहू क्रीडा संकुल ते पोवई नाका या दरम्यान असलेल्या दुकानदारांची चांगलीच धांदल उडाली. आपली दुकाने उघडण्याचा प्रयत्न करताच आलेल्या वाऱयाने साहित्याची आवराआवर करताना त्यांची पळापळ केली. तसाच प्रकार बॉम्बे रेस्टॉरंट चौकातही घडला. वाऱयाचा आणि पावसाचा वेग दुपारी थोडा मंदावला होता. त्यावेळी पुन्हा दुकानदारांनी आपली दुकाने उगडली. बॉम्बे रेस्टॉरंट चौक येथील  निलेश राजेभोसले यांच्या जय भवानी सर्व्हिसिंग सेंटरचे वादळात पत्रे उडून गेले.

पालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग सतर्क

शहरात निसर्ग चक्री वादळाने कोठे ही हानी, पडझड झाल्यास लगेच त्या ठिकाणी पोहचुन मदत करता यावी याकरता पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे एक पथक मुख्याधिकारी शंकर गोरे, उपमुख्याधिकारी संचित धुमाळ यांनी तयार ठेवले होते. जेसीबीसह इतर वाहनांची व्यवस्था तयार ठेवली होती. कुठे शहरात झाड पडल्याचे समजताच तेथे ही टीम लगेच पोहचून मदत कार्य करत आहे. तसेच शहरात कोठे काही झाल्यास पालिकेशी संपर्क साधावा, असे अवाहन मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी केले आहे.

यवतेश्वर घाटात पडझड

वादळी वाऱयासह जोरदार कोसळणाऱया पवसामुळे शहर परिसरातील डोंगर भागात कोरकोळ स्वरुपात दगडी पडण्याच्या घटना घडल्या. येवतेश्वर घाटात तसाच प्रकार घडला असून घाटात छोटय़ा-छोटय़ा दगडी पडल्या.

Related Stories

आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज रहावे : शेखर सिंह

datta jadhav

कास पठारवरील पर्यटकांचा ओघ ओसरला

Patil_p

आज जाहीर केलेले पॅकेज हे अतिशय फसवे : देवेंद्र फडणवीस

Tousif Mujawar

सातारा : कोरोना गर्दीने नाही बाहेरुन येणार्‍यांमुळे वाढला, व्यापार्‍यांचा लॉकडाऊनला विरोध

Archana Banage

मुंब्रा येथील प्राइम रुग्णालयाला भीषण आग; 4 जणांचा मृत्यू

Tousif Mujawar

ब्लॉग; मैत्रीच्या अतुट धाग्याचे प्रतिक; भाऊसिंगजी रोड

Archana Banage