Tarun Bharat

सातारा शहरात संसर्ग आटोक्यात

प्रतिनिधी / सातारा :

सप्टेंबर महिन्यापासून जिल्हय़ातील कोरोना स्थिती आटोक्यात येत असून, हॉटस्पॉट ठरलेल्या सातारा तालुक्यातील स्थितीही सुधारत आहे. गेल्या पाच, सहा दिवसांपासून सातारा तालुक्यात दोन अंकी वाढ समोर येत आहे. सध्या सातारा तालुक्यात ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 749 एवढी आहे. यामध्ये ग्रामीण भागात 346, शहरी भागात 335, होम आयसोलेट 89, कोरोना सेंटरमध्ये 549, प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये 82 रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. डी. एच. पवार यांनी दिली.

आजमितीस सातारा तालुक्यात 3 लाख 98 हजार 595 जणांची तपासणी झाली असून त्यापैकी 3 लाख 54 हजार 18 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला तर बाधितांची एकूण संख्या 50 हजार 442 एवढी आहे. त्यापैकी 48 हजार 677 जणांनी कोरोनावर मात करत लढाई जिंकलीय. यामुळे साताऱ्याचा रिकव्हरी रेट 96.27 टक्के एवढा आहे. तर एकूण 1 हजार 455 जणांचा मृत्यू झाला असून ग्रामीण भागात 742, शहरी भागात 503 तर जिल्हय़ाबाहेरील 208 जणांचा समावेश यात आहे. आजमितीस 749 ॲक्टिव्ह रुग्ण संख्या आहे. मात्र, त्यापैकी 89 रुग्ण होम आयसोलेट तर 549 हे संस्थात्मक विलगीकरण व ग्रामीण भागात सोय करण्यात आलेल्या आयसोलेशन सेंटरमध्ये आहे तर कोरोना केअर सेंटरमध्ये 29 रुग्ण दाखल आहेत. प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये फक्त 82 रुग्ण शासकीय व खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

Related Stories

सातारा : संभाव्य पावसाळी आपत्तींचा सामना करण्यासाठी सर्व विभागांनी सज्ज रहावे

Archana Banage

ट्रक खरेदी व्यवहारात फसवणूक

Patil_p

PM मोदींच्या निषेधार्थ प्रहारचा थाळीनाद

datta jadhav

सातारा जिल्हा काँग्रेस कोविड मदत व सहाय्य केंद्राचे सोमवारी उद्घाटन – डॉ. सुरेशराव जाधव

Archana Banage

जिल्हाबंदीची कडक अंमलबजावणी करा; मंत्री देसाई यांचे पोलिसांना आदेश

datta jadhav

पुणे-मुंबईपेक्षा उच्चांकी संख्येने साताऱ्यात कोरोनाचा कहर

datta jadhav