Tarun Bharat

सातारा शहरात सापडला आणखी एक कोरोनाबाधित

● प्रतापगंज रुग्णाच्या संपर्कातील महिला, मावशी ?
● सातारा शहर एकूण 8
● शहरात साखळी वाढण्याची भीती
● कैदी 4, आरोग्यकर्मी 2, प्रतापगंज पेठ 1
● शहरांत पुन्हा घबराहट

सातारा / प्रतिनिधी

सातारा शहराला लोकडाऊन मधून सूट हवी असल्याची मागणी वाढू लागली असतानाच गुरुवारी शहराला आणखी एक झटका बसला.
शहरातील बाधित असलेल्या प्रतापगंज पेठेतील युवकांच्या अतीसंपर्कात आलेली महीला कोरोना झाल्याचे गुरुवारी कळले.
ही महिला बाधित रुग्णाची मावशी असल्याचे स्थानिकांकडून सांगितले गेले. शिवाय त्या आधीपासून क्वारंटाईनमध्ये होत्या.

सातारा शहरात एकूण 8 इतकी बाधितांची संख्या झाली आहे. सदरबझारची महिला आरोग्यकर्मी १, गार्डन सिटीची महिला आरोग्यकर्मी १,
प्रतापगंज पेठ येथील तरुण १, पुण्याहून आलेले कैदी ४ तर आज गुरुवारी सापडलेला १अशी 8 संख्या झाली. जिल्ह्यात 93 जण बाधित आहेत. कराड तालुक्यात वनवासमाचीत 35, मलकापूर 16 , साकुर्डी 2, कापील 2, कराड शहर 4, फलटण तालुका 5 अशी आकडेवारी आहे.

कोरोनामुक्तीची प्रतीक्षा
जिल्ह्यात कोरोनाचा उपचार सुरू असून 15 दिवस झालेल्यांची संख्या किमान 10 च्या पुढे आहे. त्यामुळे गुरुवारी काही जण कोरोनामुक्त होणाऱ्यांची मोठी संख्या असावी असा कयास असून याबाबत अधिकृत माहिती आलेली नाही.

Related Stories

पेगॅससने नाही तर मग देशात येऊन कुणी हेरगिरी केली- नवाब मलिक

Archana Banage

जितेंद्र आव्हाड यांच्या घराबाहेर राडा

datta jadhav

सातारा : हॉटेल नमस्ते पुरोहितच्या विरोधात पाचगणी नगरपालिकेसमोर आंदोलन

Archana Banage

पर्यटकांची वाढती गर्दी पाहता कास पठारावर

Amit Kulkarni

जिल्हा बँकेसाठी 20 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

datta jadhav

फुले दांपत्यांचे कार्य ऊर्जा व प्रेरणा देणारे

Patil_p