Tarun Bharat

सातारा शहरासह जिह्यात उत्स्फुर्तपणे बंद

प्रतिनिधी/ सातारा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱयाच्या हितासाठी तीन बिले केलेली आहेत. या बिलाला काँग्रेस, अकाली दल, राष्ट्रवादी काँग्रेससह घटक पक्षाने विरोध केला आहे. तीच बिले रद्द करण्यासाठी पंजाबच्या शेतकऱयांनी पुकारलेल्या देशव्यापी बंदात सातारा जिह्यानेही बंदमध्ये उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवला. शहरी भागात कडकडीत बंद दिसत होता तर ग्रामीण भागात शेतकरी मात्र शेताच्या कामात व्यस्त होता. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ज्या संघटना सातत्याने आंदोलन करत असतात त्या संघटनांनी पाठींबा देण्यासाठी निदर्शने केली.

आजच्या भारत बंदमध्ये सातारा शहरातली बाजार पेठ दररोज सकाळी 10 वाजता सुरु होते. परंतु आज बाजार पेठेत व्यापाऱयांनी आपली दुकाने उघडली नाहीत. घरीच राहून सुट्टीचा आनंद घेतला. राष्ट्रवादीचे युवकचे जिल्हाध्यक्ष तेजसराव शिंदे यांच्यासह कार्यकर्त्यांनी दुचाकी रॅली काढून बंदचे आवाहन केले. त्यांना सातारा शहर पोलिसांनी विनापरवाना दुचाकी रॅली काढल्याप्रकरणी त्यांना ताब्यात घेतले. शहरात मुख्य बाजारपेठेत पोवई नाका, राजपथ, मोती चौक, बसस्थानक परिसरातील सर्व दुकाने बंदच होती. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर किसान मंचच्या कार्यकर्त्यांनी तासभर निदर्शने करुन जिल्हाधिकाऱयांना निवेदन दिले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. यावेळी अर्जुनराव साळुंखे, रमेश पिसाळ यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. सातारा जिल्हा ट्रान्सपोर्ट माल व प्रवासी वाहतूक असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश गवळी यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली.यावेळी कार्यकर्ते उपस्थित होते.

भाजी मंडईत शुकशुकाट

साताऱयाची बाजार समितीने स्वःतहून बंद ठेवल्याने आडते, व्यापाऱयांकडे शेतकऱयांचा आज शेती माल आला नव्हता. त्यामुळे शहरातील युनियन भाजी मंडई, महात्मा फुले भाजी मंडई, रविवार पेठेतील समर्थ भाजी मंडईमध्ये शुकशुकाट दिसत होता. बाजार समितीच्या बाहेर पोलीस बंदोबस्त दिसत होता.

एसटी बसेसच्या फेऱया रद्द केल्याने नोकरदारांची झाली गैरसोय

सातारा जिल्हा बंद असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस, कॉंग्रेस आणि शिवसेनेने जाहीर करताच आज सकाळपासून जिह्यातील सकाळी काही बसेसच्या फेऱया सोडण्यात आल्या. मात्र, दुपारी फेऱया बंद होत्या. त्यामुळे जे शासकीय, निमशासकीय कर्मचारी एसटीने कामाच्या ठिकाणी येजा करतात त्यांची मात्र चांगलीच गैरसोय झाल्याने नाराजी व्यक्त केली.

ग्रामीण भागातील शेतकरी मात्र शेतीच्या कामात व्यस्त

शेतकऱयांच्या नावाने पुकारण्यात आलेला बंद शहरात दिसत होता. ग्रामीण भागातल्या बाजार पेठा जरी बंद असल्या तरीही शेतकरी मात्र शेतीच्या कामात व्यस्त होता. त्यात ऊस तोड, शाळूचे भांगलण, पश्चिम भागात गवत काढणे आदी कामात शेतकरी व्यस्त असल्याचे दिसत होते. 

Related Stories

सातारा : जनता दरबारात 61 तक्रारींचा जागीच फैसला

Archana Banage

सदरबझारात पावसात रस्त्याचे काम सुरू

Patil_p

शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याचे प्रकाश पाटील यांनी दिले वचन

Archana Banage

KOLHAPUR AIRPORT- आजपासून कोरोना प्रतिबंधात्मक नियमाची अंमलबजावणी

Rahul Gadkar

गुंगीचा स्प्रे मारून भ्याड चोरी

Patil_p

रणजितभैय्यांनी जपली सामाजिक बांधिलकी!

Patil_p
error: Content is protected !!