Tarun Bharat

सातारा शहर चा नवा कारभारी कोण ?

तत्कालीन पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांची सांगली येथे बदली : शहर पोलीस ठाण्याचा प्रभारी कारभार पीआय मोरे यांच्याकडे

प्रतिनिधी /सातारा

तत्कालीन पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांची बदली सांगली येथे झाली आहे. त्यांनी पदभार स्विकारला आहे. यामुळे शहर पोलीस ठाण्याचा नवा कारभारी कोण याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. सध्या पोलीस निरीक्षक संदीप मोरे यांच्यावर शहर पोलीस स्टेशनचा प्रभारी कारभार दिला आहे.

सातारा शहर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी दि. 13 डिसेंबर 2019 रोजी शहर पोलीस ठाण्याचा कारभार स्विकारला. त्यांच्या कार्यकाळ त्यांनी जुगार अड्डयावर छापे टाकले. बेकायदा दारू जप्त केली. तसेच अनेक चोरटय़ांच्या मुसक्या आवळल्या. शहरातील गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी त्यांनी चांगले योगदान दिले. दि. 16 ऑगस्ट  2021 रोजी त्यांची बदली सांगली येथे झाली आहे. त्यांची बदली होवून त्यांनी सांगली येथील पदभार स्विकारला आहे. परंतु अद्याप शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पदी कोणाचीही वर्णी लागलेली नाही. या पदाचा अतिरिक्त प्रभारी पदभार पोलीस निरीक्षक संदीप मोरे यांच्याकडे देण्यात आलेला आहे. पोलीस निरीक्षक मोरे हे सदर बाझार पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक पदी कार्यरत होते. अद्याप पोलीस निरीक्षक हे पद रिक्त असल्याने शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा बसणार कसा असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रभारी पदभारामुळे ठोस निर्णय घेण्यास वारंवार अडचणी येणार आहेत.

सातारा शहर पोलीस स्टेशन : पोलीस निरीक्षकांची नावे

के. जी. मगदूम, एल. पी. शेजवळ, व्ही. आर. सुर्वे, व्ही. आर. भोळे, एच. आर. थोरात, बी. ए. चाचे, पी. के. घार्गे, एस. व्ही. जगदाळे, शहाजीराव पाटील, एस. व्ही. जगदाळे, एम. एस. जोशी, ए. व्ही. गायकवाड, जी. व्ही. निकम, आर. डी. शिंदे, श्रीधर पा. जाधव, दयानंद ढोमे, रविंद्र पिसाळ, राजीव मुठाणे, बी. आर. पाटील, एन. एम. सारंगकर, एस. सी. पोरे, पी. डी. जाधव, ए. आर. मांजरे

Related Stories

एस.टीची चाके आली पुर्वपदावर

Patil_p

सातारा जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी घुले यांचा अजितदादांच्या हस्ते सन्मान

Patil_p

फी भरणे बंधनकारक

Patil_p

कोल्हापुरात कोरोना पॉझिटिव्ह सांगलीत निगेटिव्ह

Archana Banage

खबरदार…जिलेबीला परवानगी नाकाराल तर

Amit Kulkarni

प्रलंबित प्रश्नांच्या अनुषंगाने खासदार उदयनराजेंनी घेतली बैठक

Patil_p