Tarun Bharat

सातारा शहर परिसरातून दोन दुचाकी लंपास

सातारा

 शहर व परिसरातून अज्ञात चोरटय़ांनी दोन दुचाकी लंपास केल्याच्या तक्रारी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. एकीकडे दुचाकी चोर सापडत असताना दुसरीकडे दुचाकी चोऱया होण्याचे सत्र काही बंद होत नाही. दुचाकी चोऱयांच्या घटनांमुळे नागरिकांना मात्र त्रास सहन करण्याची वेळ येते. दुचाकी चोरटय़ांचा बंदोबस्त काही होत नाही. सातारा शहर परिसरच नव्हे तर आता जिल्हय़ातील ग्रामीण भागातून देखील दुचाकी चोऱयांच्या घटनांमध्ये वाढ झालीय. दुचाकी चोरणारांमध्ये युवावस्थेतील चोरटय़ांचे प्रमाण जास्त असून केवळ चैनीसाठी अशा प्रकारे दुचाकी चोऱया करण्याचा प्रकार युवकांमध्ये वाढतोय याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. दरम्यान, याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 19 नोव्हेंबर रोजी 6 वाजण्याच्या दरम्यान पंताचा गोट सातारा येथून राहत्या घरासमोर पार्किंग केलेली 15 हजार रुपये किंमतीची दुचाकी क्रमांक (एम.एच.14एजे-0828) अज्ञात चोरटय़ाने लंपास केल्याची तक्रार अमीन शेख (रा. पंताचा गोट, सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. तपास पोलीस हवालदार जगदाळे करत आहेत. अन्य एका घटनेत दि. 2 डिसेंबर रोजी सकाळी 11 ते 6 वाजण्याच्या दरम्यान बॉम्बे रेस्टॉरंट, सातारा येथील जाधव-कंग्राळकर बिल्डिंगमधील एका ऑटोमोबाईल दुकानासमोरून अज्ञात चोरटय़ाने 18 हजार रुपये किंमतीची दुचाकी क्रमांक (एम.एच.11एजे- 8963) लंपास केल्याची तक्रार विजय भानुदास गुजर (रा, जकातवाडी ता. सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

Related Stories

रहिमतपूर नगरपालिका करतेय सातारा का नाही?

datta jadhav

कोरोना काळात राजकारण करणाऱ्यांना जागा दाखवून द्या ; भगीरथ भालकेंसाठी अमोल कोल्हे प्रचाऱ्याच्या मैदानात

Archana Banage

कराचीत होणार ऑनलाईन शिवजयंती

Patil_p

पेढा भरवून पुष्पगुच्छ देणारे राज्यपाल मी पहिल्यांदाच पाहिले

datta jadhav

साताऱयाची लेक निघाली मिस इंडियाच्या स्पर्धेसाठी

Patil_p

कृष्णा काठावर 15 ते 25 डिसेंबर कालावधी नदी उत्सव : जिल्हाधिकारी

Abhijeet Khandekar