Tarun Bharat

सातारा शहर होणार बटरफ्लाय सीटी

प्रतिनिधी/ सातारा

सातारा शहराला लागूनच महादरे गावाच्या डोंगरभागात गतवर्षी फुलपाखरांचे राखीव वनक्षेत्र घोषीत केले होते. त्यानुसार सातारा पालिकेने नुकत्याच झालेल्या सभेमध्ये हद्दवाढीत आलेल्या महादरेच्या काही भागामुळे शहरालाच बटलफ्लाय सीटी कशी करता येईल याचे पहिले पाऊल उचलले आहे. महादरे तलावाचे सुशोभिकीकरण करण्यात येणार असून तसा ठराव घेतला गेला. शहरातही ठिकठिकाणी फुलपाखरांची माहिती देणारे फलक लावण्यात येणार आहेत.

सातारा शहरापासून जवळ असलेल्या महादरे गावालगत असलेला डोंगर पावसाळय़ात नेत्रांना सुखद आनंद देतो. तेथे असलेली जंगली झाडे वन्यप्राणी, पक्षी यांच्यासाठी आश्रयस्थान आहेत. गतवर्षीच वनविभागाने फुलपाखरु संवर्धन क्षेत्र घोषित करण्याच्या हालचाली सुरु केल्या होत्या. फुलपाखरु संवर्धन राखीव क्षेत्र महादरेचे वनक्षेत्र घोषीत झाल्यानंतर साताऱयाकडे येणाऱया पर्यंटकांचाही कल मोठा असणार आहे. त्याकरता साताऱयाचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी नुकत्याच झालेल्या पालिकेच्या सभेत अजेंडय़ावर विषय आणला होता. तो मंजूर करण्यात आलेला असून या विषयाच्या अनुषंगाने सातारा शहर हे बटरफ्लाय सीटी बनवण्यासाठी पहिले पाऊल आहे. महादरेचा काही भाग हा सातारा शहरात नव्याने झालेल्या हद्दवाढीत आलेला आहे. त्यामुळे दरे येथील महादरे तलावाच्या परिसरात संवर्धन करण्यासाठी तेथे वॉर्किंग टॅक व पालिकेच्यावतीने जागा पाहून फुलपाखरांची माहिती देणारे फलक लावण्यात येणार आहेत. शहरातही चौकाचौकात या फुलपाखरु राखीव वन क्षेत्र व त्यामध्ये आढळून येणारी विविध प्रजातीची फुलपाखरे यांची माहिती देणारे फलक बसवण्यात येणार आहेत. त्यानुसार पालिकेकडूनही आता बटरफ्लाय सिटी करण्याच्या अनुषंगाने हालचाली सुरु आहेत. तसेच महादरेचे वनक्षेत्र हे 107 हेक्टरपर्यत पसरलेले आहेत. या क्षेत्रात 178 फुलपाखरांच्या विविध जाती आढळून आलेल्या आहेत, असा दावाही काही जंगलप्रेमींनी केलेला आहे.

चौकट

शहर बटलफ्लाय सिटी करण्याचा मानस

सातारा शहराच्या बाजूने निसर्गविविधता नटलेली आहे. महादरे येथील फुलपाखरु राखीव वनक्षेत्र वनविभागाने संरक्षीत केलेले असल्याने आम्ही पालिकेच्यावतीने महादरे तलावाच्या परिसरात फुलपाखरांची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच शहरातही महादरे परिसरातील फुलपाखरु राखीव वनक्षेत्र कसे आहे याची माहिती देणारे काही फलक लावले जातील, त्यामुळे सातारा शहर बटरफ्लाय सीटी करण्याचा मानस आहे.

Related Stories

‘ते’ राज्यपालांचे वैयक्तिक मत; मुख्यमंत्र्यांची सावध भूमिका

datta jadhav

हाजी अली दर्ग्यावर दहशतवादी हल्ल्याची धमकी

datta jadhav

किल्ले वसंतगडवरील ढासळलेल्या ‘त्या’ बुरूंजाचे संवर्धन होणार

datta jadhav

फोन टॅपिंगसाठी रश्मी शुक्लांनी मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली होती का?; नवाब मलिकांचा सवाल

Archana Banage

आ. शिवेंद्रसिंहराजेंनी केले नुतन पोलीस अधिक्षकांचे स्वागत

Patil_p

वनसमितीच्या पैशावर कासाणीतील टग्यांचा डोळा

Patil_p