Tarun Bharat

सातारा : संभाव्य पावसाळी आपत्तींचा सामना करण्यासाठी सर्व विभागांनी सज्ज रहावे

Advertisements

प्रतिनिधी / महाबळेश्वर

पावसाळ्यात येणार्या संभाव्य आपत्तींचा सामना करण्यासाठी सर्व विभाग प्रमुखांनी सज्ज रहावे असे आवाहन वाई उपविभागीय अधिकारी संगिता राजापुरकर यांनी येथील हिरडा विश्रामगृहावर झालेल्या तालुका आढावा बैठकीत केले या वेळी तहसिलदार सुषमा चैधरी पाटील या देखिल उपस्थित होत्या.

सध्या आपण कारोना महामारीचा मुकाबला करीत आहोत या बरोबरच लवकरच पावसाळा सुरू होत आहे राज्यात सर्वाधिक पावसाचे प्रमाण महाबळेश्वर तालुक्यात आहे आपला भाग दुर्गम व घनदाट जंगलांनी वेढलेला आहे त्या मुळे पावसाळयात वेगवेगळया आपत्ती उद्भवतात अशा वेळी आपण आपल्या विभागात स्वतंत्र आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन करावा या कक्षात सक्षम अधिकारी यांची नेमणुक करण्यात यावी या केंद्रात संपर्काची सर्व साधणे असावीत या कक्षाशी संपर्क साधल्यास तातडीने मदतकार्य करणारे पथक घटना स्थळी तातडीने रवाना झाले पाहीजे जिल्हाधिकारी यांच्या परवागणी शिवाय कोणत्याही अधिकारी यांनी आपले मुख्यालय सोडु नये संभाव्यपुर येणारी गावे व दरड कोसळणारे रस्ते या ठिकाणी अथवा लगतच्या गावात शिघ्र कृतीदलाची स्थापना करण्यात यावी.

या दलात काम करणारांना प्रशिक्षण दिले जावे महसुल पंचायत समिती व कृषी विभाग यांच्यात कायम समन्वय असावा शेतीचे नुकसान झाल्यास तातडीने नुकसानीचे पंचनामे झाले पाहीजेत पावसाळयात येणाऱ्या साथ रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी उपाय योजनांचा आराखडा तयार करण्यात यावा सर्वच गावातुन जंतुनाशकाची फवारणी करण्यात यावी पिण्याच्या पाणी दुषित होणार नाही. याची खबरदारी घेण्यात यावी वैदयकिय उपचार देणारे कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात यावी रूग्णवाहीका व रूग्णांना लागणारी औषधे मागवुन ठेवावी पावसाळयात अनेक गावांचा संपर्क तुटतो अनेक वेळा दळणवळणाची गैरसोय होते म्हणुन कोरोनाची लक्षणे असलेल्या आजरी व्यक्तीं कोरोनाची टेस्ट करण्याची टाळाटाळ करण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा वेळी त्या व्यक्तीचा आजार बळावण्याचा धोका आहे म्हणुन सर्व विभागांनी एकाही कोरोना रूग्णाचे उपचारा अभावी निधन होणार नाही याची खबरदारी घ्यावी अशा सुचना या बैठकीत प्रांताधिकारी संगिता राजापुरकर यांनी केल्या

या बैठकीला तहसिलदार सुषमा चैधरी पाटील , पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील , वीज वितरण विभागाच्या उपविभागीय अभियंता दिपाली बर्गे, आदी अधिकारी या आढावा बैठकीला उपस्थित होते.

Related Stories

सातारा : बाधितांच्या वाढत्या संख्येने स्थिती गंभीरच

Abhijeet Shinde

देशात महाराष्ट्र पोलीस दलाचे काम उत्कृष्ट

Patil_p

बिबट्याच्या हल्ल्यात सात वर्षांच्या मुलाचा बळी

datta jadhav

सातारा विकास आघाडीतच रणकंदन

Patil_p

कोरेगावचे वाटोळे करणाऱयांना जनता हद्दपार करणार

Patil_p

कोरोना चाचण्या वाढवण्यावर भर

Patil_p
error: Content is protected !!