Tarun Bharat

सातारा : सदर बाजारमधील रहिवाशी कर्नाटकात मतदानासाठी रवाना

सातारा / प्रतिनिधी : 

कर्नाटक राज्यातील 5 हजार 762 ग्रामपंचायतीच्या निवडणूका सध्या सुरु आहेत. त्या निवडणूकीत मतदान करण्यासाठी सातारा शहरातील सदर बाजार व परिसरातील मतदारांना नेण्यासाठी कर्नाटकहून खासगी वाहने आली होती. दोन दिवसांपूर्वी ही वाहने भरून कर्नाटकात रवाना झाली.

यामधील काही मतदारांचे नाव साताऱ्यातही आहे आणि कर्नाटकातही आहे. त्यामुळे दोन्ही राज्यात मतदानाचा हक्क बजावणाऱ्या मतदारांवर नक्की काय कारवाई होणार अशी चर्चा सुरु आहे. सातारा शहरात कर्नाटकातून कामगार म्हणून आलेले आणि स्थायिक झालेले अनेक नागरिक आहेत. ते शहरातील सदर बाजारमध्ये लक्ष्मी टेकडी परिसर, भीमाबाई आंबेडकर झोपडपट्टी तसेच प्रतापसिंह नगर झोपडपट्टी येथे वास्तव्यास आहेत. 

दोन्ही ठिकाणी मतदान करणाऱ्या दुबार मतदारांचा शोध घेवून त्यांच्यावर प्रशासनाकडून नेमकी काय कार्यवाही होणार अशीही दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.

Related Stories

पॉलिशच्या बहाण्याने दागिने चोरणारी टोळी जेरबंद

datta jadhav

वाहतूक शाखेचा कारभार गोंडसेंच्या खांद्यावर

Patil_p

चोरून आणलेल्या वीट, साहित्यावर सुरू आहे बंगल्याचे बांधकाम

Patil_p

वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत शिवराज राक्षेला सुवर्ण

datta jadhav

सहा बाधितांनी कराड हादरले

Patil_p

धावली गावावर दरड कोसळण्याचे सत्र सुरूच

datta jadhav