Tarun Bharat

सातारा सावरतोय; शहरात केवळ 240 सक्रीय रुग्ण

प्रतिनिधी/ सातारा

दुसऱया लाटेत हॉटस्पॉट ठरलेल्या सातारा शहरासह तालुक्यात गेल्या काही दिवसात बाधित वाढ मंदावलेली असली तरी अद्याप तीन अंकी संख्येने वाढ सुरुच आहे. 10 जुलैच्या अहवालानुसार सध्या सातारा शहर व तालुक्यात 951 बाधित रुग्ण सक्रीय असून यापैकी शहरात केवळ 240 रुग्ण सक्रिय असल्याने सातारा सावरु लागल्याचे चित्र आहे. तसेच ग्रामीण भागात 660 रुग्ण आहेत. यामध्ये होम आयसोलेट रुग्ण संख्या 414 असून प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये 233 जणांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोना केअर सेंटरमध्ये 166 रुग्ण आहेत.

सातारा तालुक्यात कोरोना संसर्ग कालावधीत 1 लाख 96 हजार 836 जणांचे स्वॅब तपासण्यात आले. यामध्ये 1 लाख 60 हजार जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते तर या दीड वर्षात एकूण बाधितांची संख्या 42 हजार 394 एवढी झाली होती. यामुळे सातारा तालुक्याचा पॉझिटिव्हीटी दर 17.09 टक्के राहिलेला होता.  मात्र, त्यापैकी 38 हजार 781 जणांनी कोरोनावर मात करत लढाई जिंकली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील 15 हजार 90 तर शहरातील 5 हजार 163 कोरोनामुक्तांचा समावेश आहे.

गेल्या काही दिवसांपासून सातारा शहर व तालुक्यातील कोरोना बाधित वाढीचा वेग मंदावलेला असला तरी तो अद्याप तीन अंकी संख्येने सुरुच आहे. नागरिक नियम पाळत आहेत. आरोग्य विभागाचे कामही गतीने सुरु असून शहरात नगरपालिका तर ग्रामस्तरावर दक्षता कमिटय़ांकडून काम सुरु असले तरी कोरोना बाधित वाढ शुन्यावर कधी येणार याचीच सर्व सातारावासिय वाट पहात आहेत.  

जानेवारी-जून दरम्यान 20 हजारांवर बाधित

सातारा तालुका हॉटस्पॉट ठरला होता. माध्ये जानेवारीत 466 बाधित, फेब्रुवारीत 518 बाधित होते. तर मार्चनंतर स्थिती गंभीर झाली होती. मार्चमध्ये 1,478, एप्रिलमध्ये तर 8,35 बाधित झाले होते तर जून महिन्यात तब्बल 5,772 बाधित समोर आले होते. जुलैमध्ये हा वेग कमी झाला आणि 796 बाधित झाले होते. या कालावधीत एकूण 20 हजार 851 बाधित झाले होते. या दरम्यान 212 बाधितांचा मृत्यू झालेला आहे.

Related Stories

”जर अशा पद्धतीने लोक फिरणार असतील तर कडक निर्बंध गरजेचे”

Archana Banage

शाहुवाडी तालुक्यातील भोसलेवाडी-कडवे बंधारा खचला

Archana Banage

गोकुळ शिरगाव येथील बारा वर्षाच्या मुलीचे अपहरण

Archana Banage

सिद्धगिरी कणेरी मठावरील गुरुपौर्णिमा यंदा ऑनलाईन

Archana Banage

राज्यातील डीपीसींना चार हजार कोटींची तरतूद

Patil_p

प्रतापगड, अजिंक्यतारा किल्ल्यांची होणार सुधारणा

Patil_p