Tarun Bharat

सातारा : हिरापूरच्या विद्यार्थ्यांना मिळाला ‘त्यांचा’ मदतीचा हात

Advertisements

प्रतिनिधी / नागठाणे

हिरापुर (ता. सातारा) येथील दारिद्रयरेषेखाली असणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना कराड येथील आदर्श मुख्याध्यापक अर्जुन कोळी यांनी अॅन्ड्राइड मोबाईलची भेट दिली. त्यामुळे त्यांच्या शिक्षणाची वाट सुलभ झाली.

कोरोनाजन्य परिस्थितीमुळे सध्या सर्वत्र ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. अशात हिरापूर शाळेतील इयत्ता तिसरीत शिकणारा यश शिंदे अन् इयत्ता चौथीत शिकणारी श्रावणी जाधव या विद्यार्थ्यांकडे अॅन्ड्राइड मोबाईल नव्हता. परिस्थितीमुळे ते मोबाईलही विकतही घेऊ शकत नव्हते. ही बाब शाळेतील शिक्षिका स्वाती चव्हाण, पवार यांच्या लक्षात आली. त्यांनी ती कराड नगरपालिका शाळेचे आदर्श मुख्याध्यापक अर्जुन कोळी यांना याबाबत विनंती केली. ती मान्य करत कोळी यांनी या विद्यार्थ्यांना हिरापूर येथे येऊन दोन मोबाईल भेट दिले.

यावेळी व्यवस्थापन समिती सदस्य सुरेश पवार, अंगणवाडी सेविका नीता जाधव, सारिका जगताप तसेच पालक उपस्थित होते. कार्यक्रमात स्वाती चव्हाण यांनी कोळी यांच्या अनोख्या दातृत्वाबद्दल आभार मानले. गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ यांच्यासह मान्यवरांनी कोळी तसेच शाळेतील शिक्षकांचे अभिनंदन केले.

Related Stories

‘हिरकणी’ च्या शुभांगी पवार यांचा अपघातात दुर्देवी अंत

Patil_p

शिवभोजन योजनेची अंमलबजावणी 26 जानेवारीपासून

Patil_p

कोयना परिसर भूकंपाने हादरला

Patil_p

कराडला दीड दिवसाच्या गणपतींचे विसर्जन

Patil_p

नकलाकाराकडून काय अपेक्षा ठेवायच्या

Patil_p

सातारा : कडक लॉकडाऊनचे पोलीस अधीक्षकांचे संकेत

datta jadhav
error: Content is protected !!