Tarun Bharat

सातारा हिल मॅरेथॉनचा रविवारी थरार!

प्रतिनिधी / सातारा :

कोरोनाची तीव्रता कमी झाल्याने प्रशासनाच्या नियमांना अधीन राहून रविवारी (दि.12) ‘सातारा हिल हाफ मॅरेथॉन’चे आयोजन करण्यात येत आहे, अशी माहिती मॅरेथॉनच्या संयोजन समितीने एका निवेदनाद्वारे दिली आहे.

कोरोना साथीची तीव्रता कमी झाल्याने तसेच लसीकरण मोहीम देशभरात व खासकरून महाराष्ट्रात प्रभावीपणे राबविण्यात आल्यामुळे पुणे, मुंबई, दिल्ली, बंगळुरू, हैद्राबाद, गोवा यांसह देशभरात व जगभरातही अनेक मोठय़ा शहरांमध्ये अलीकडच्या काळात मॅरेथॉन स्पर्धा आयोजित झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा प्रशासनाने यावर्षी ‘सातारा हिल हाफ मॅरेथॉन’चे संयोजन नेहमीपेक्षा खूप छोटय़ा प्रमाणावर व नियमांना अधीन राहून करण्यास परवानगी दिली आहे. सातारा हिल मॅरेथॉन गेल्या वर्षी कोरोनामुळे होऊ शकली नाही. पण यावर्षी नेहमीपेक्षा केवळ पंचवीस टक्के स्पर्धकांना घेऊन व त्याबाबतचे सोशल डिस्टंसिंग राखणे, मास्क लावणे, लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण असणे, निर्जंतुकीकरण इत्यादी सर्व निकष पाळून यावर्षीची मॅरेथॉन यशस्वीपणे पार पाडण्याकरिता आम्ही प्रयत्नशील आहोत.

मॅरेथॉनपटू सतत गतिशील असतात. एका जागी फार काळ थांबत नाहीत. त्यामुळे सहसा एकमेकांच्या जवळ जाण्याची शक्यता निदान धावताना तरी खूप कमी असते. धावायला सुरुवात करण्यापुर्वी वॉर्म अप करताना सर्व स्पर्धकांमध्ये योग्य अंतर राखले जाईल, याची खबरदारी घेणार आहोत. पोलिस कवायत मैदानाच्या एकूण क्षमतेच्या साधारणपणे 20 टक्के इतक्या लोकांनाच प्रवेश दिल्यामुळे तसे करणे सहज शक्य होईल. तसेच मॅरेथॉन संपल्यावर धावपटू एकत्र जमू नयेत यासाठी रन झाल्यावर लगेच त्यांना त्यांचे मेडल व नाश्त्याचे सीलबंद पाकीट हातात देण्यात येईल. स्पर्धकांची संख्या नेहमीपेक्षा खूपच कमी असल्यामुळे यंदा गर्दी होणार नाही किंवा रांगा लागणार नाहीत. शिवाय यावेळी बक्षीस समारंभही ठेवलेला नाही. त्यामुळे रनर्स मंडळीना रन झाल्यानंतर शक्यतो लवकरात लवकर मैदानाबाहेर पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. स्पर्धेदिवशी ऑफिशियल बिब घातलेल्या रनर्सव्यतिरिक्त त्यांच्या कोणाही मित्रांना अथवा नातेवाईकांना त्याठिकाणी प्रवेश मिळणार नाही. सहभाग घेणाया सर्व स्पर्धकांनी कोविड लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत याची खातरजमा केल्यावरच त्यांना प्रवेश देण्यात आला आहे. आदल्या दिवशी शनिवारी एक्सपोच्या वेळी सर्व स्पर्धकांनी 28 नोव्हेंबरपूर्वी (स्पर्धेच्या आधी किमान 15 दिवस) लसीचा दुसरा डोस घेतला आहे याची तपासणी केली जाणार आहे. या सर्व खबरदारीच्या उपाययोजना करून योग्य काळजी घेण्यात येत असल्याचे समितीने म्हटले आहे.

Related Stories

कोरोना रूग्णांना आता घरीच ऑक्सीजन मिळणार

Patil_p

वऱ्हाडाच्या ट्रकला अपघात;23 जण जखमी

Patil_p

शेखर सिंह यांनी घेतला पदभार

Patil_p

अवकाळीने सातारकर वैतागले

Patil_p

महाराष्ट्र केसरीसाठी 55 हजार कुस्तीप्रेमींना बसण्याची सोय

datta jadhav

सातारा : विजयकुमार बाचल यांना डॉ. कलाम ॲवॉर्ड

datta jadhav