हुतात्मा सूरज लामजे अमर रहे..! या घोषणांचा गजर; सैन्यदलातील साहित्य घेऊन जात असताना वाहन दरीत कोसळून झाला मृत्यू
वार्ताहर/परळी
परळी खोऱ्यातील काळोशी (ता. सातारा) येथील सुरज लक्ष्मण लामजे (वय 28) या जवानाचा लडाख (जम्मू काश्मीर) येथे हे अपघाती मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री बाराच्या सुमारास घडली. सुरज यांचे पार्थिव काल, रविवारी रात्री उशिरा सातारा जिल्ह्यात आणण्यात आले. त्यानंतर रात्री 10 च्या जवळपास त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यविधी करण्यात आले.
हुतात्मा सूरज लामजे यांच्या घरातच सैनिकी वारसा होता. त्यातूनच आपणही देशाचे काही तरी देणे लागतो या भावनेतून ते भरती झाले होते. कुरुन गावचे सुपुत्र सुरज हे सण 2014 मध्ये मुंबई लष्करात भरती झाले होते. त्यानंतर बंगळूर येथे त्यांचे प्रशिक्षण झाले. सध्या ते लडाख येथे कर्तव्य बजावत होते. सुरज हे चालक असल्याने शुक्रवारी रात्री बाराच्या सुमारास सैन्यदलातील साहित्य घेऊन जात असताना त्यांचे वाहन दरीत कोसळली त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
सुरज यांना गावच्या विकासाबरोबरच गावाला जिल्ह्यात एक नवी ओळख करण्याचा त्यांचा मानस होता. मनमिळावू, मित्रांसाठी सच्चा मित्र, मिश्किल आशा नानाविविध कलांमध्ये पारंगत असलेला सूरज आज आपल्याला कायमचा निरोप घेऊन गेला आहे हे लामजे कुटुंबियांन बरोबर काळोशी ग्रामस्थना पण यावर विश्वास बसत नाही. हुतात्मा लामजे यांचे पार्थिव जसे बोगद्यातून बाहेर आपल्या गावाकडे निघू लागले तेव्हा डबेवाडी, माणेवाडी, भोंदावडे या गावातील ग्रामस्थांनी रस्त्यावरून हुतात्मा सूरज लामजे अमर रहे च्या गजराने संपूर्ण भाग दणाणून सोडला होता.
हुतात्मा सुरज यांचा विवाह दोन वर्षांपूर्वी झाला होता. तसेच त्यांना 3 महिन्याचा एक मुलगाही आहे. सूरज यांनी आपल्या मुलाला हाती ही घेता आले नाही. सोशल मीडियाद्वारे कधी पाहणे झाले असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यांच्या पश्चात आई, वडील, आजी, पत्नी, मुलगा, एक भाऊ, बहिण असा परिवार आहे.


previous post
next post