Tarun Bharat

सातारा : होम आयसोलेट ८,७४५ जण बरे

होम आयसोलेट 8,745 जण बरे, रविवारी 145 इतके बाधित
जिल्ह्यात 181 जण कोरोनामुक्त, कोरोनाची स्थिती नियंत्रणात
मृत्यूदरही घटतोय, 8 बळी, दुर्गोत्सव साधेपणात होतोय साजरा

प्रतिनिधी / सातारा

जिल्हय़ात ऑक्टोबरच्या मध्याला कोरोनाची स्थिती नियंत्रणात आल्याचे दिसत असून दररोज मोठय़ा संख्येने वाढणारी बाधितांची संख्या मंदावत चालली आहे. त्यामुळे बेडसाठी होणारी पळापळ, ऑक्सिजन बेडसची कमतरता या समस्या दूर झाल्याने सर्वांना दिलासा मिळू लागलाय. लक्षणे नसलेले पण बाधित होम आयसोलेट असलेले रुग्ण लवकर बरे होवू लागले असून आतापर्यंत 8,745 घरी राहून बरे झालेत. नागरिक काळजी घेवू लागले आहेत. सवयभान राखण्याचा प्रयत्न सर्वजण करत असताना मृत्यूदरही घटू लागला आहे. दरम्यान रात्री उशिरा आलेल्या अहवालात 145 जणांचा अहवाल बाधित आला आहे.

दुर्गोत्सव साधेपणात होतोय साजरा
जिल्हय़ात दुर्गोत्सवात देखील मोठी धूमधाम असते. कडक उपवास आणि भक्तीची परिक्षा घेणारे नवरात्राचे दिसत दुर्गाभक्त श्रध्देने साजरा करत असतात. रासदांडियाचा जल्लोष असतो. सर्व माहोल गर्दीचा व उत्साहाचा असतो. मात्र, यावर्षी कोरोनाने आचारसंहिता घालून दिलेली असल्याने नागरिक आपापल्या घरात दुर्गोत्सव साधेपणात साजरा करत आहेत. मास्क, स्वच्छता व सुरक्षित अंतर या त्रिसुत्रीचा वापर करुन नागरिक देवीची आराधना करत आहेत.

एकूण 2,120 पैकी 523 झोन ॲक्टिव
जिल्हय़ात 2 हजार 120 झोन असून त्यापैकी 430 ग्रामीण व 93 शहरी झोन असे 523 झोनमध्ये कोरोना बाधित आढळून येत आहेत. तर 1 हजार 597 झोन इनऍक्टिव असून यामध्ये 1,390 ग्रामीण व 207 शहरी झोनचा समावेश आहे. कोरोना नियंत्रणात येवू लागला असला लस येईपर्यंत काळजी हा समाजजीवनाचा अविभाज्य भाग बनून राहणार आहे. केंद्र शासनाकडून लस देण्याचा कार्यक्रम जाहीर झाला असून नागरिकांना या वृत्ताने दिलासा मिळाला आहे.

जिल्हय़ात 8 बाधितांचा मृत्यू
जिल्हा रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्या वाढे ता. सातारा 69 वर्षीय पुरुष तसेच जिह्यातील विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये बोराटवाडी ता. माण 46 वर्षीय पुरुष, गोडोली ता. सातारा 63 वर्षीय पुरुष, कराड 63 वर्षीय पुरुष, पाटण 75 वर्षीय पुरुष, तसेच उशिरा कळविलेले गुरुवार पेठ ता. सातारा 72 वर्षीय पुरुष, कराड 70 वर्षीय पुरुष, गणेश मंदिर वाढे ता. सातारा 75 वर्षीय पुरुष अशा एकूण 8 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे.

181 नागरिकांना रविवारी डिस्चार्ज
जिह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्याना रविवारी संध्याकाळपर्यंत 181 नागरिकांना घरी सोडण्यात आले.

57 जणांचे नमुने तपासणीला
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 23, पानमळेवाडी येथील 1, फलटण येथे 20, मायणी येथे 4, पिंपोडा 9 असे एकूण 57 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आलेत.

रविवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण नमुने 1,71,511
एकूण बाधित 43,656
एकूण कोरोनामुक्त 36,397
मृत्यू 1,430
उपचारार्थ रुग्ण 5,644

रविवारी
बाधित………145
मुक्त…………..181
बळी………….8
तपासणीला….57

आज रविवारची स्थिती
एकूण बेड………….7,657
एकूण उपचारार्थ…..5,499
दाखल रुग्ण………..1,258
होम आयसोलेट……3,924
रिक्त बेड……………6,372

कोरोना केअर सेंटर
(क्षमता 4,100 पैकी दाखल 317)
रिक्त बेड 3,783

डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल सेंटर डीसीएचसी आणि डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल डीसीएच
(3,847 क्षमतेपैकी दाखल 1,258)
रिक्त बेड 2,569

2,568 दाखल पैकी
ऑक्सिजन शिवाय……299
ऑक्सिजनसह………..730
आयसीयू………………229

Related Stories

बाधित वाढ, मृत्यूदर खाली घसरल्याचा दिलासा

Amit Kulkarni

तारळी धरणग्रस्तांचा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी

datta jadhav

पोलीस बंदोबस्तात स्वारगेट बस कराडात दाखल

Patil_p

राजधानी साताऱ्यात दसरा उत्साहात

Archana Banage

सातारा : जिल्ह्यातील १६ जणांचा मृत्यू तर २१४ कोरोनाबाधित रुग्ण

Archana Banage

सातारा : भरोसा सेलच्या कारभारी बदलल्या

datta jadhav
error: Content is protected !!