Tarun Bharat

सातारा : ‘होम आयसोलेशन’ रूग्णांनी नियम पाळणे गरजेचे – जिल्हा आरोग्य अधिकारी

Advertisements

जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरूद्ध आठल्ये
जिल्ह्यात 1 हजार 9 अतिसौम्य बाधित होम आयसोलेशनमध्ये

प्रतिनिधी / सातारा

कोरोनाची अतिसौम्य लक्षणे असणाऱया रूग्णांना कोविड केअर सेंटर (सीसीसी) किंवा घरी स्वतंत्र सोय असल्यास विलगीकरण म्हणजे ‘होम आयसोलेशन’ करण्याचे निर्देश आहेत. या निर्देशानुसार जिल्ह्यात 1 हजार 9 रूग्णानां ‘होम आयसोलेशन’ करण्यात आले आहेत. घरी स्वतंत्र सोय असल्याने रूग्ण होम आयसोलेशनचा पर्याय निवडत आहेत. यातील काही रूग्ण नियमांचे पालन करत नसल्याने घरातील सदस्यच नव्हे तर शेजाऱयांनासुद्धा कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे रूग्णांनी काळजी घेणे गरजेचे झाले असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरूद्ध आठल्ये यांनी तरूण भारतशी बोलताना सांगितले.

आठल्ये म्हणाले, नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार अतिसौम्य किंवा लक्षणे नसलेल्या कोरोना बाधित रूग्णांना जर त्यांच्या घरामध्ये योग्यप्रकारे सुविधा उपलब्ध असेल तर त्यांच्या संमतीनुसार ‘होम आयसोलेशन’ केले जात आहे. होम आयसोलेशनमध्ये रूग्णाला हवेशीर बंद खोलीत रहावे लागते. शक्यतो स्वतंत्र शौचालय असावे लागते. घरात फिरण्यावर बंधने असतात. घराबाहेर पडण्यावर प्रतिबंध असतो. घरी दिवस-रात्र काळजी घेणारी व्यक्ती असावी लागते. मोबाईलवरील आरोग्य सेतू ऍपवर ऍक्टिव्ह असावे लागते. या सर्व सोयी असल्यावरच होम आयसोलेशन केले जाते. ज्यांच्या घरी सोयी-सुविधांचा अभाव दिसत आहे. त्यांना कोविड केंअर सेंटर मध्येच ठेवले जात आहे.

बाधितांचा आकडा वाढू नये म्हणून पूर्ण काळजी घेतली जात आहे. 14 दिवस घराबाहेर न पडता नियमांचे पालन करणे गरजेचे झाले आहे. जिल्ह्यात तालुकानिहाय रविवार दि. 23 पर्यंत‘होम आयसोलेशन’ केलेल्या रूग्णांची संख्या पुढील प्रमाणे-सातारा 313, वाई 73, फलटण 40, माण 15, महाबळेश्वर 34, कोरेगाव 101, पाटण 51, खटाव 20, खंडाळा 25, कराड 321, जावली 16 असे एकून 1 हजार 9 अतिसौम्य बाधित आहेत.

Related Stories

रब्बी हंगामासाठी नेर कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी

Abhijeet Shinde

…अन्यथा मंत्र्यांच्या घरावर दगडफेक

datta jadhav

…अन्यथा लॅबची मान्यता रद्द करणार

datta jadhav

कृष्णा कारखान्यावर सहकार पॅनेलचे वर्चस्व

Abhijeet Shinde

थरार सुरू; कुस्तीप्रेमींचा जल्लोष वाढला

Patil_p

बिबटय़ाचा हल्यात 7 शेळ्या 1 गाई 1 खोंड ठार

Patil_p
error: Content is protected !!