Tarun Bharat

सातारा : 10 लाख बिलाची मागणी; प्रतिभा हॉस्पिटलवर संतप्त नातेवाईकांची दगडफेक

सातारा / प्रतिनिधी

येथील प्रतिभा हॉस्पिटलमध्ये लक्ष्मण जाधव(रा.गडकर आळी) हे गेल्या एक महिन्यापासून उपचारासाठी उपचारासाठी दाखल होते. त्यांना विविध कारणे देत रुग्णालयातच ठेवून घेतले.पुढील उपचारासाठी पुणे येथे नेण्याचा विचार नातेवाईकांनी बोलून दाखवला. रुग्णालयाने अगोदर बिल भरा अशी विनंती केली.दुपारी रुग्ण मृत झाल्याचे समजताच सायंकाळी नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये तोडफोड केली. रुग्णालयाच्या आवारात वातावरण तणाव पूर्ण झाले होते.पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.

याबाबत मिळालेली माहिती अशी की गडकर आळी येथील शिक्षक असलेले जाधव हे गेल्या एक महिन्यांपूर्वी आजारी पडले.त्यांना उपचारासाठी नातेवाईकांनी प्रतिभा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचारास सुरुवातीला प्रतिसाद देत होते.मात्र प्रकृतीत सुधारणा होत नव्हती.रुग्णालय प्रशासनाने बिल 10 लाख मागणी केली त्यावर नातेवाईकांनी पुढील उपचारासाठी पुण्याला नेण्यासाठी परवानगी मागितली. परंतु कोरोना व इतर कारणे सांगत रुग्ण सोडण्यास नकार दिला.उरलेले तीन लाख द्या मगच पुण्याला न्या असे सांगताच नातेवाईकांनी सकाळी रुग्णासोबत बोलणे केले आणि पैशाची तजवीज करायला गेले.दुपारी रुग्णालयाने तुमचा नातेवाईक गेल्याचे सांगताच संतप्त झालेल्या नातेवाईकांनी रुग्णालयात जाऊन तोडफोड केली. पोलिसांना याची माहिती मिळताच लगेच घटनास्थळी पोहचले तणाव निर्माण झाला होता.घटनास्थळी रात्री उशिरा खासदार उदयनराजे येणार असल्याची चर्चा होती.

दाखल असलेल्या रुग्णावर पुढील उपचारासाठी आणखी तीन लाख द्यावेत अशी अडवणूक केली जात होती.तर नातेवाईकांनी त्यांना आम्ही रुग्णाला पुणे येथे नेतो 10 लाख रुपये भरलेत असे म्हणून विनंती करत होते.परंतु रुग्णालय प्रशासनाने रुग्णास न सोडल्याने त्या रुग्णाचा मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या नातेवाईकानी दगडफेक केल्याचे सांगण्यात येते.वातावरण तणावाचे झाले होते.खासदार उदयनराजे घटनास्थळी गेल्याचे समजते.

Related Stories

साताऱ्यात 1 ते 31 डिसेंबर कालावधीत क्षय रोग आणि कुष्ठ रोग रुग्ण शोध मोहिम

Archana Banage

मदन भोसलेंनी भ्रष्टाचारातून प्रचंड पैसा कमावला

Patil_p

सातारा : बनावट सोने प्रकरण; आठ परप्रांतीयांची टोळी जेरबंद

datta jadhav

रायगाव फाटय़ावर अपघातात पोलीस जवानाचा मृत्यू

Patil_p

फुल बाजार कोमेजला

Patil_p

सातारा : प्रांत कार्यालयासमोरील पार्किंग जागेवर दुमजली वाहनतळ उभारणार

Archana Banage