Tarun Bharat

सातारा : 155 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 528 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

Advertisements

सातारा / प्रतिनिधी

जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 155 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले तर 528 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.  
  विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमधून डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये  जावली तालुक्यातील 1, कराड तालुक्यातील 27, खंडाळा तालुक्यातील 1, खटाव तालुक्यातील 5, कोरेगाव तालुक्यातील 12, महाबळेश्वर तालुक्यातील 14, माण तालुक्यातील 4, पाटण तालुक्यातील 13, फलटण तालुक्यातील 4, सातारा तालुक्यातील 67, वाई तालुक्यातील 7 असे एकूण 155 नागरिकांचा समावेश आहे.

528 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 26, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड 59, फलटण 26, कोरेगांव 32, वाई 31, खंडाळा 45, रायगांव 28, पानमळेवाडी 48, मायणी 32, महाबळेश्वर 19, दहिवडी 33, खाबली 24 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड 125 असे एकूण 528 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत,अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

Related Stories

सातारा : कोरोनामुक्तीचा रेट ८० टक्क्यांच्या पुढे

Archana Banage

कृष्णा हॉस्पिटलमध्ये कोरोनामुक्तीचे त्रिशतक

Patil_p

कराडचा अमिर शेख एक वर्षासाठी स्थानबद्ध

Patil_p

यवतेश्वर घाटात तिनशे फुट खोल दरीत कार कोसळली; दोघेजण गंभीर जखमी

Abhijeet Khandekar

शिवसेनेच्या सुरेखा पखाले बिनविरोधने सेनेने खाते खोलले

Patil_p

यवतेश्वर घाटात बिबटय़ाचे दर्शन

Patil_p
error: Content is protected !!