Tarun Bharat

सातारा : हरिहरेश्वर बँकेत 37 कोटी 46 लाखांचा गैरव्यवहार, 29 जणांवर गुन्हा दाखल

112 जणांच्या नावे बनावट कर्ज खाते, अनेक पतसंस्थांनाही लावला चुना पश्चिम महाराष्ट्रातल्या सहकार विभागात खळबळ

प्रतिनिधी / सातारा

वाई येथील हरिहरेश्वर बँकेमध्ये 112 बनावट कर्ज काढून ठेवीदारांच्या पैशांचा गैरव्यवहार झाला आहे. तब्बल 37 कोटी 46 लाख 89 हजार 344 रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी जिल्हा लेखापाल विजय सांवत यांनी बँकेचे चेअरमन अजित गुलाबराव खामकर, व्हाईस चेअरमन जगन्नाथ बाजीराव सावंत, संस्थापक संचालक नंदकुमार ज्ञानेश्वर खामकर यांच्यासह 29 जणांवर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यामुळे पश्चिम महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.

वाई पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की विजय सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हरिहरेश्वर बेँकेचे चेअरमन अजित गुलाबराव खामकर, व्हाईस चेअरमन जगन्नाथ बाजीराव सावंत, संस्थापक संचालक नंदकुमार ज्ञानेश्वर खामकर, संचालक वजीर कासमभाई शेख, मनोज श्रीधर खटावकर, प्रकाश केरबा ओतारी, विलास गणपत खामकर, चंद्रकांत धर्माजी शिंदे, विष्णूपंत शंकर खरे, अर्जुन दिगंबर खामकर, जनार्दन आनंदा वैराट, किरण भास्कर कदम, सौ. जयश्री वसंत चौधरी, सौ. जयमाला विजय खामकर, तज्ञ संचालक गोविंद तुकाराम लंगडे, अरुण महादेव केळकर, संतोष शिवाजी चोरगे, व्यवस्थापक रमेश दगडू जाधव, वाईचे शाखा प्रमुगा विनोद मनोहर शिंदे, खंडाळय़ाचे शाखा प्रमुख रणजित खाशाबा शिर्के, वडूथचे शाखा प्रमुख सुनील चंद्रकांत वंजारी, भुईंजचे शाखा प्रमुगा वसंत आनंदा सणस, वाई शाखेचे रोखपाल सुचित महादेव जाधव, वडूथ शाखेचे रोखपाल महेश प्रताप शिंदे, भुईज शाखेचे रोखपाल दीपक धर्माजी शिर्के, खंडाळा शाखेचे रोखपाल तानाजी मानसिंग भोसले, सनदी लेखपाल राहुल धोगंडे, डी.बी. खरात, एन.एस.कदम यांनी 2011 ते दि.31 मार्च 2019 च्या दरम्यान हरिहरेश्वर डेव्लपर्स वाई या फर्मच्या नावाने सोनगिरवाडी येथील सर्व्हे नंबर. 71/2 व सर्व्हे नंबर 25/1 अ/2/3 या मिळकतीलवर 62 कर्जदारांच्या नावे बनावट कागदपत्रे व दस्तऐवज तयार करुन गहाणखत व कर्जप्रकरणे दाखवून बांधकाम केलेल्या सदनिका कर्जदारांना दिल्याचे दाखवून कर्ज घेवून बँकेची, सभासदांची व ठेवीदारांची फसवणूक केली आहे.

तसेच वजीर कासमभाई शेख यांनी सिटी सर्व्हे नंबर 1224,2024, 665, 587,. 327 सर्व्है नेंबर 108/2 या मिळकतीवर एशियन डेव्हलपर्स या फर्मचे नाव 50 कर्जदारांच्या नावे बनावट कागदपत्रे व दस्तऐवज तयार करुन गहाण खत व कर्ज प्रकरणे दाखवून बांधकाम केलेल्या सदनिका कर्जदारांना दिल्याचे दाखवून बँकेतून संबंधितांच्या नावे कर्ज घेवून बँकेच्या सभासदांची व बँकेची व सभासदांची फसवणूक केली आहे. पदाचा गैरवापर करुन स्वतःच्या आर्थिक फायद्याकरता सभासद, ठेवीदार यांचा विश्वासघात करुन 112 बनावट कर्जप्रकरणे तयार करुन बँकेची 26 कोटी 78 लाख 8 हजार 789 रुपयांचा गैरविनीयोग केलेला आहे.

हरिहरेश्वर बँकेच्या 2015 -16 , 2016-17, 2018-19 या कालावधीत प्रत्यक्षात बनावट कर्ज खात्यावर रक्कमेचा भरणा न करता 112 कर्ज खात्यावर रक्कम भरणा केल्याचे दाखवून 10 कोटी 24 लाख 42 हजार 154 एवढय़ा रक्कमेचा अपहार केला ओह. भद्रेश्वर नागरी सहकारी पतसंस्था यांनी हरिहरेश्वर बँकेत ठेवलेल्या व परत काढून घेतलेल्या गुंतवणूकीवर बनावट ठेव तारण कर्ज प्रकरण तयार करुन ती रक्कम बँकेच्या बनावट कर्ज खात्यावर भरणा केली. पुढे भद्रेश्वर पतसंस्थेचे ठेव तारण कर्ज निरंक करण्यासाठी छ. संभाजी महाराज पतसंस्था पिंपोडे शाखा वाई, किसान नागरी सहकारी पतसंस्था वाई यांनी बँकेत ठेवलेल्या व परत केलेल्या गुंतवणूकीवर ठेवतारण कर्ज निर्माण करुन 44 लाख 38 हजार 401 रुपयांचा अपहार केला आहे.

हरिहरेश्वर बँक वाई या बँकेच्या आर्थिक निधीचा गैरविनियोक व अपहार करुन बँकेच्या ठेवीदारांची, सभासदांची 37 कोटी, 46 लाख, 89 हजार 344 रुपयांची फसवणूक केली आहे. त्यामुळे 29 जणांच्यावर आयपीसी 420, 464, 465, 467, 468, 471, 34, महाराष्ट्र सहकारी संस्था 1960 चे कमल 81(5)(ब) ठेवीदार हितरक्षण अधिनियम 1999 चे कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे हे तपास करत आहेत.

Related Stories

“मौका सभी को मिलता है,” – नितेश राणेंचा इशारा

Archana Banage

चारचाकीच्या धडकेत महिला वकील जखमी

datta jadhav

सदरबाजारातील रानगवा पुन्हा वनक्षेत्रात

datta jadhav

सातारा : वाई पोलिसांनी 24 तासात चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या

Archana Banage

सातारा : कोरोनाबाधितांचा आकडा पोहचला ३० हजारावर

Archana Banage

5G सुपरफास्ट…लवकरच…!

Abhijeet Khandekar