Tarun Bharat

सातारा : 761 नागरिकांना दिला डिस्चार्ज; 1209 जणांचे नमुने पाठविले तपासणीला


सातारा / प्रतिनिधी :

जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 761 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 1209 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

1209 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 16, उपजिल्हा रुग्णालय कराड 31, उपजिल्हा रुग्णालय फलटण 68, कोरेगाव 61, वाई 160, खंडाळा 147, रायगांव 121, पानमळेवाडी 80, मायणी 214, महाबळेश्वर 49, पाटण 41, दहिवडी 50, तळमावले 25 व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड 246 असे एकूण 1209 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत,अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

घेतलेले एकूण नमुने –57369
एकूण बाधित — 24578
घरी सोडण्यात आलेले — 15594
मृत्यू — 690
उपचारार्थ रुग्ण — 8294

Related Stories

अंगणवाडी सेविकांचे घंटानाद तर पोषण आहार संघटनेचे मुक्कामी उपोषण

datta jadhav

कोयनेत भूकंपाचा सौम्य धक्का

Patil_p

दिव्यनगरीत अज्ञातांनी दुचाकी पेटवून दिल्या

Amit Kulkarni

सातारा : फेक अकाऊंटवरुन लग्नासाठी धमकी

datta jadhav

सहलीच्या बसला बेलवडे हवेली येथे अपघात

Patil_p

सातारा तालुक्यातील रात्रीत 137 जण बाधित

Patil_p