Tarun Bharat

सातार्यात घर मालकानेच केला भाडेकरू विवाहितेवर बलात्कार


सातारा / प्रतिनिधी

साताऱ्यातील करंजे येथे भाड्याने राहाणाऱ्या विवाहित महिलेची स्नान करतानाची चित्रफित बनवून ती व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल होऊन ही आजही आरोपी मोकाट फिरत आहे. आरोपीला जर आज दुपारपर्यंत अटक केली नाही तर राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या बंगल्यासमोर विष घेऊन आत्महत्या करणार असल्याचा इशारा पीडितेचा पती आणि आई यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला.


याबाबत पीडित कुटुंबाने त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित विवाहित महिला तिचा पती, लहान मुलगी ही पाच ते सहा वर्षांपासून भाड्याने करंजे येथील बाबर कॉलनी येथे शिवाजी बाबर यांच्या भाड्याच्या खोलीत राहतात. गेल्या एक महिन्यांपूर्वी शिवाजी बाबर यांचा मुलगा अमित याने बाथरूमच्या खिडकीची काच फोडून महिला स्नान करतानाचे व्हिडीओ चित्रिकरण केले. ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची भीती दाखवून वारंवार पीडितेवर बलात्कार केला तसेच मारहाण केली. हा प्रकार पीडितेच्या पतीने आणि आईने पिडीतेजवळ अधिक विचारपूस केल्यांनतर हा सगळं प्रकार उघडकीस आला.

त्यांनतर पीडित महिला आणि कुटुंबीयांनी तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला गेले असता पोलिसांनी त्यांना अगोदर सातारा तालुका पोलीस ठाणे नंतर शाहूपुरी पोलीस ठाणे असे खेळवत रात्री उशिरा गुन्हा दाखल करून घेतला. गुन्हा दाखल झाल्यानंतर ही आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नसून संशयित आरोपी पीडितेच्या आईला व पतीला धमकी देत आहे. अमित बाबर व त्याचे दोन साथीदार यांना अटक न केल्यास सायंकाळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या बंगल्यासमोर आम्ही विष पिऊन आत्महत्या करणार असल्याचे पीडितेच्या नातेवाईकांनी सांगितले.

Related Stories

सातारा : अंगापूर तर्फ तारगांवची निवडणूक बिनविरोध

datta jadhav

ज्योतीने व्यापारी ओसवालांसह चौघांचे खून केले?

Amit Kulkarni

सोनगाव-कुमठे रस्त्यावरील पुलासाठी 7.30 कोटींचा निधी मंजूर

datta jadhav

राष्ट्रवादी काँग्रेस करणार लोककलावंतांच्या खात्यावर प्रत्येकी ३ हजार रुपये जमा

Archana Banage

सात महिन्यात चिकूनगुनिया-डेंग्यूचे 124 रुग्ण

datta jadhav

साताऱ्याच्या हिरकणी रायडरचा नांदेडमध्ये अपघाती मृत्यू

datta jadhav