Tarun Bharat

साताऱयाची होणार ‘जीआयएस मॅपिंग’

Advertisements

पालिकेत हालचाली सुरु : शहरातील रस्ते, गटर, बागा यांचे होणार गुगलद्वारे माहिती संकलित केली जाणार

प्रतिनिधी /सातारा

सातारा शहर हे ऐतिहासिक शहर आहे. या शहरात अनेक पुरातन वास्तू आहेत.  शहराचा बदल दिवसेंदिवस होत आहे. शासनाच्या नव्या नियमावलीनुसार सातारा शहराचे जीआयएस प्रणालीद्वारे मॅपिंग करण्यात येणार आहे. यामध्ये शहरातील रस्ते, बागा, गटर, पालिकेच्या मालमत्ता, खाजगी मालमत्ता यांची माहिती संकलित करण्यात येणार आहे. तशा पालिकेत हालचाली सुरु झाल्या असून ही माहिती गोळा केल्यानंतर एका क्लिवर सातारा शहरातील सर्व माहिती मिळणार आहे. 

जुन्या सातारा शहराची स्थापना ही छत्रपती शाहु महाराजांनी केल्याचे इतिहासात दाखले आहेत. त्याच शहराचा विस्तार अलिकडच्या काळात वाढला गेला आहे. त्यातच गतवर्षी शहराची हद्दवाढ झाली आहे. त्यामुळे ऐतिहासिक अशा साताऱयाची जुनी माहिती, नकाशे हे कागदस्वरुपात मिळून येतात. आता मात्र, नव्याने सातारा पालिकेकडे शासनाचा आदेश आला असून संपूर्ण शहराचे जीएसआय मॅपिंग करण्यात येणार आहे. या मॅपिंगनुसार शहरातील रस्ते, गटर, बागा, सार्वजनिक जागा, मैदाने, खाजगी जागा, बसस्थानके अशी सर्व माहिती संकलित करण्यात येणार आहे. तसा आदेश नुकताच सातारा पालिकेत मिळाला असून पालिकेकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. येत्या काही दिवसात शहरातील जीआयएस मॅपिंग प्रणाली पूर्ण होईल त्यानुसार एका क्लिकवर माहिती मिळाली जाईल, अशी यंत्रणा अस्तित्वात येईल. त्याकरता काम सुरु होण्यासाठी लवकरच एका सामाजिक संस्थेला हे काम देण्यात येणार आहे. त्यांच्याकडून काम पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष जीआयएस प्रणाली अस्तित्वात येणार आहे.

प्रत्यक्ष लवकरच कामाला सुरुवात होईल

शासनाकडून जे नियम आहेत. त्या मार्गदर्शक तत्वानुसार सातारा शहराचे जीआयएस मॅपिंग केले जाणार आहे. जीआयएस म्हणजे भौगोलिक माहिती प्रणाली आहे. जी सर्व प्रकारच्या भौगोलिक डेटा कॅप्चर करुन व्यवस्थित ठेवला जातो. डिझाईन करुन ठेवला जातो. नगरविकास विभागाकडून सूचना आलेल्या आहेत. त्यानुसार लवकरच कामाला सुरुवात होईल, असे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी सांगितले.

Related Stories

दावणीतून सुटलेले काही लोंक इथे तिथे फिरत आहेत

Patil_p

सातारा : संभाव्य पावसाळी आपत्तींचा सामना करण्यासाठी सर्व विभागांनी सज्ज रहावे

Abhijeet Shinde

जागा अडवणाऱ्यांना घरी बसवा : आ. शिवेंद्रराजे

datta jadhav

ताथवडा घाटात जबरी चोरी

Patil_p

महाराष्ट्र केसरीचा आखाडा यंदा सातारला?

Patil_p

जिल्हाबंदी झुगारून सहलीस येणे पर्यटकांना पडले महागात

Abhijeet Shinde
error: Content is protected !!