Tarun Bharat

साताऱयाचे एन्ट्री पॉईंट विकसीत करणार

प्रतिनिधी/ सातारा

सातारा शहराची सर्वच एन्ट्री पाँईटचा विकासीत करुन शहरात बाहेरु येणाऱयांना बघत रहावेसे वाटेल असा कायापालट करण्यात येईल. त्याचा प्रस्ताव तयार केला आहे, अशी ग्वाही खासदार उदयनराजेंनी दिली.s दरम्यान, गोडोली, विलासपुर, शाहुनगरकरता नवीन तलाठी कार्यालय मंजूर झाले आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

विलासपूर येथील बापूजी साळुंखे नगर येथे गार्डन व ओपन जीमचे उद्घाटनप्रसंगी ते मान्यवरांच्या उपस्थितीत बोलत होते. यावेळी युवा नेते संग्राम बर्गे, उपाध्यक्ष मनोज शेंडे, नगरसेवक ऍड. दत्ता बनकर, अप्पा पिसाळ, किरण नलावडे, विभुते, सतीश माने, ऍड. विकास पवार, गणेश नलावडे, महेश चौगुले, आशाताई जाधव, ऍड. मनिषा पवार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना खासदार उदयनराजे म्हणाले, या ओपन जीमचा विलासपूर भागातील लोकांना जास्तीत जास्त लाभ मिळावा. या भागात छोटीसी इमारतही होणे गरजेचे आहे. जेणेकरुन कमिटी हॉल असावा. त्यात लायब्ररी असावी, या भागातील लोक एकत्र येवून कार्यक्रम घेतात. याच सुद्दा नियोजन करावे. त्यास लागेल तो निधी आम्ही उपलब्ध करुन देवू, अशी ग्वाही देत पुढे ते म्हणाले, हे करताना सगळयांचा सहभग महत्वाचा आहे. तुम्हाला जी विकास कामे सुचतील ती सांगत जावा, अडीअडचणी आल्या तर त्या सोडवू. इंदिरानगरच्या जवळ चांगला एन्ट्री पॉईट ओह. त्यांचे सुशोभिकरण करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. लवकरच त्याही कामास सुरुवात केली जाईल. आपल्या सेवेसाठी सैदव बांधील आहोत, असे  सांगत, त्यांनी विलासपूर, शाहुनगर, गोडोलीकरता स्वतंत्र तलाठी कार्यालयाची मंजूरी मिळाली आहे. नवीन बिल्डींग झाली तेथे हे कार्यालय सुरु होईल. त्यामुळे नागरिकांना राजवाडय़ाकडे जावे लागणार नाही, असे त्यांनी सांगितले.

जेष्ठांनी केले कौतुक

विलासपुरमध्ये कामांच्या शुभारंभाचा सोहळा छोटेखानी पार पडला. परंतु या कार्यक्रमावेळी तेथील ज्येष्ट नागरिकांनी खासदार उदयनराजेंच्या पाठीशी ठामपणे उभे राहू असे निक्षून सांगितले अन् त्यांनी केलेल्या कामांचे कौतुक केले.

Related Stories

लक्ष्मी टेकडीवरील घरकुलाचे काम अर्धवट

datta jadhav

राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेकीने खळबळ

Patil_p

राजधानीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादुकांचे स्वागत

Patil_p

भाजप जिल्ह्यातील सर्व निवडणुका लढवणार

datta jadhav

जिल्हय़ात राष्ट्रीय लसीकरण दिवस उत्साहात

Patil_p

किल्ले अजिंक्यताऱयावर तटबंदीच्या कडेने झाडे लावण्यावरुन शिवभक्तांमधून संताप

Patil_p