Tarun Bharat

साताऱयाच्या व्यावसायिकाला दहा लाखाचा चुना

कच्चा माल पुरवण्याची बतावणी करत भामटय़ाचा पोबारा, उद्योजकांत खळबळ

प्रतिनिधी/ सातारा

येथील समर्थनगरातील एका व्यावसायिकास कच्चा माल पुरवतो, अशी बतावणी करुन त्या व्यावसायिकास तब्बल 9.87 लाखाला चुना लावून भामटय़ाने पोबारा  केला. या घटनेमुळे उद्योजकांमध्ये खळबळ उडाली आहे. या व्यावसायिकाला फसवणूक करणाऱया प्रसाद गणेश पाठक या भामटय़ावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. सातारा शहर याचा तपास करत आहेत.

शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, विक्रमसिंह हणमंत राजेकुंभार (वय 37, रा. प्लॉट नंबर 6, चैताली कॉलनी, समर्थनगर, सातारा) हे व्यवसायिक आहेत. प्रसाद गणेश पाठक (पूर्ण पत्ता माहित नाही) याने राजेकुंभार यांना प्लास्टिकचा कच्चा माल पुरवतो असे सांगून 9 लाख 97 हजार 100 रुपये घेतले आणि दोन दिवसांत मालाचा पुरवठा करतो, असे दि. 27 नोव्हेंबर 2020 रोजी सांगितले. दोन दिवसानंतर त्याने मालाचा पुरवठा केला नव्हता. त्याला ज्या-ज्यावेळी फोन करण्यात आला त्या-त्यावेळी त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. दरम्यान, प्रसाद पाठक याने दि. 5 डिसेंबर 2020 पासून त्याचा मोबाईल बंद करुन ठेवला आहे. अजूनही तो स्वीच ऑफ आहे. त्यामुळे विक्रमसिंह राजेकुंभार यांनी शुक्रवार, दि. 12 फेबुवारी रोजी रात्री पावणेनऊ वाजता प्रसाद पाठक याच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक पाटील करत आहेत.

Related Stories

सातारा : ‘त्या’ वनकर्मचाऱ्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

Archana Banage

ग्रामीण कोरोना फैलाव रोखण्यासाठी केंद्राची नवी नियमावली

Archana Banage

Satara : सरकारी नोकरीचे अमिष दाखवून ११ लाखांची फसवणूक

Abhijeet Khandekar

महिनाखेर बाधितांचा आकडा होईल 10,000 पार

Patil_p

सातारा : ग्रेड सेपरेटर येथे स्टंट करणाऱ्या युवकावर गुन्हा दाखल

Archana Banage

अज्ञात वाहनाच्या धडकेत लोणंद चा युवक ठार

Archana Banage