Tarun Bharat

साताऱयात अथक प्रयत्नानंतर मांजामध्ये अडकलेल्या घारीला जीवनदान

वनविभागाचे पथक – पक्षीप्रेमी यांचा पुढाकार

प्रतिनिधी/ सातारा

 नगरपालिकेजवळ शाहू चौकात एका उंच झाडावर मांजामध्ये अडकलेल्या घार पक्षाला वनविभागाचे पथक आणि पक्षी प्रेमींनी अथक प्रयत्नाने जीवदान दिल्याची घटना शुक्रवारी सकाळी 9 ते 9.30 वाजण्याच्या सुमारास घडली.

 तरुणाईकडून पतंग उडवण्यासाठी मांजाचा मोठय़ा प्रमाणावर वापर केला जातो. मुळात मांजाचा दोरा वापर व त्याच्या विक्रीवर शासनाने बंदी घातली असून, मांजा वापरणे हा कायद्याने गुन्हा असतानाही त्याचा सर्रास वापर केला जातो हे वारंवार निदर्शनास आले. सातारा येथील नगरपालिकेजवळील शाहू चौकात एका उंच झाडावर मांजा मध्ये एक घार अडकून पडल्याचे शुक्रवारी सकाळी काही जणांच्या निदर्शनास आले. त्यांनी ही बाब सातारा तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी निवृत्ती चव्हाण यांना कळवताच ते आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले.

घार मांजा मध्ये अडकली ते झाडावरील उंच ठिकाण होते. त्यासाठी क्रेनची आवश्यकता असल्याचे लक्षात येताच निवृत्ती चव्हाण यांनी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांच्याशी संपर्क साधून नगरपालिकेची क्रेन देण्याची मागणी केली. शेंडे यांनी तात्काळ नगरपालिकेची क्रेन उपलब्ध करून दिल्यानंतर  वनविभागाचे पथक आणि पक्षीप्रेमींनी मांजराच्या दोऱयामधून त्या घारीची सुखरूप सुटका केली.

याबाबत निवृत्ती चव्हाण यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे,  देशामध्ये दररोज हजारो पक्षांना प्राणघातक मांजामध्ये अडकून प्राण गमवावे लागतात. कित्येक पक्षी कायमचे जायबंदी होतात. पक्षी हा घटक जैवविविधतेचा अत्यंत महत्त्वाचा घटक असून त्याला वाचवणे जगवणे व त्याचे संवर्धन करणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. पक्ष्यांना घातक ठरणाऱया मांजाची विक्री करणे, वापरणे हा कायद्याने गुन्हा असून तसे आढळल्यास त्याची तक्रार वन विभागाकडे करण्यात यावी. मांजा वापरणे हा वन्य जीव संरक्षण कायदा 1972 च्या कलम 9 नुसार गुन्हा असून त्याकरता 3 वर्षांपर्यंत कैद व 25 हजार रुपये दंडाची कायद्यामध्ये तरतूद आहे.

Related Stories

मराठा उद्योजकांना कर्ज देण्यास KDCC बँकेने दुजाभाव करू नये- नरेंद्र पाटील

Archana Banage

गांजा पिकवायला शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे परवानगी मागावी; सदाभाऊ खोतांची खोचक मागणी

Archana Banage

अडचणीत आणू पाहणा-यांना बाजूला करून यापुढील वाटचाल करणार

Patil_p

Satara; जिल्हा परिषदेत आता नविन आकर्षणाचे ठिकाण; सेल्फी पॉईंट ठरत आहे नागरिकांचे आकर्षण

Abhijeet Khandekar

ठाणे-दिवा दरम्यानच्या नव्या रेल्वे मार्गांचे पंतप्रधानाच्या हस्ते आज लोकार्पण

Archana Banage

सातारा : डंम्पर चालकास लुटमार करून जबरदस्तीने ऐवज लुटणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक

Archana Banage
error: Content is protected !!