Tarun Bharat

साताऱयात जागतिक रंगभूमी दिन साजरा

Advertisements

लेखक नितीन दीक्षितांसह कर्मचाऱयांचा खास सत्कार 

प्रतिनिधी/ सातारा

कोरोनाच्या दुसऱया लाटेच्या परिणामाचे गांभीर्य लक्षात घेऊन शासकीय नियमांचे पालन करीत सातारकर रंगकर्मींनी शाहूकला मंदिर येथे जागतिक रंगभूमी दिन साजरा केला. सर्व प्रथम शाहूकला मंदिराच्या स्टेजचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मारुती कांबळे, नारायण भंडारे आणि मोहन गायकवाड या शाहूकला मंदिराच्या कर्मचाऱयांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी लेखक नितीन दीक्षित यांचा खास सत्कार करण्यात आला. त्यांनी लिहिलेल्या कलीरा अतिता या ओडिया चित्रपटाला ओडिया भाषेतील सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून पुरस्कार मिळाला. तसेच हा चित्रपट ऑस्करसाठी ही पाठविण्यात आला आहे. यापूर्वी नितीन दीक्षित यांनी लिहिलेल्या धग, कडवी हवा, हलका, पाणी आणि प्रभातच्या दामलेंच्यावरील माहितीपट या चार कलाकृतींना वेगवेगळ्या विभागांमध्ये अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते आणि आता कलीरा अतिता ही राष्ट्रीय पुरस्काराची मानकरी ठरलेली पाचवी कलाकृती आहे.

प्रास्ताविक कल्याण राक्षे यांनी केले. ध्रुव पटवर्धन याने आभार मानले. यावेळी कल्याण राक्षे, नितीन दीक्षित, बाळकृष्ण शिंदे, धैर्यशील उत्तेकर, प्रसाद नारकर, निलेश देशपांडे, प्रथमेश देशपांडे, नम्रता धनावडे, क्रिश उधानी, आदेश कुलकर्णी, अभिषेक परदेशी, अजित करडे, हेमंत खळतकर, प्रशांत इंगवले आदी रंगकर्मी तसेच मारुती कांबळे, नारायण भंडारे आणि मोहन गायकवाड हे रंगमंदिर कर्मचारी आणि सप्तसूर या गायकवृंदांचे कलावंत उपस्थित होते.

शाहू कला मंदिराला विसरु शकत नाही माझी सुरुवात मी शाहूकला मंदिराच्या याच रंगमंचावर केली. साताऱयातील माझ्या सहकारी मित्रांचा माझ्या या वाटचालीत नक्कीच मोलाचा वाटा आहे. आपण कितीही मोठे झालो तरी आपलं मूळ आपल्याला विसरता येत नाही आणि म्हणूनच मला शाहूकला मंदिर आणि माझ्या सातारच्या सहकारी रंगकर्मी मित्रांच्या ऋणात कायम राहायला आवडेल, अशी भावना लेखक नितीन दीक्षित यांनी व्यक्त केली

Related Stories

10 वी, 12 वी च्या पुरवणी परीक्षांचे निकाल जाहीर

Tousif Mujawar

नगरपालिकेच्या ठरावाचे नगराध्यक्षांकडून अवमूल्यन

Patil_p

आजारपणावर टीका करणे ही राजकीय प्रगल्भता नाही…

datta jadhav

“सध्या भारतात शोध पत्रकारिता नामशेष होण्याच्या मार्गावर – सरन्यायाधीश

Abhijeet Khandekar

कोवाड ग्रामपंचायत सदस्याच्या साहसाने वाचले एकाचे प्राण

Archana Banage

सातारा जिल्ह्यात ८२८ बाधित ; तर १९ मृत्यू

Archana Banage
error: Content is protected !!