Tarun Bharat

साताऱयात दुचाकीस्वारांवर कडक कारवाई

प्रतिनिधी/ सातारा

कोरोनाची स्थिती राज्यात विशेष पुणे व मुंबईत गंभीर होत आहे. काही जिल्हे ग्रीन झोनमध्ये आहेत. सातारा देखील ग्रीन झोनकडे जाण्यासाठी प्रयत्न करत असताना रस्त्यावर विनाकारण फिरणाऱयांचा मूर्खपणा काही बंद होत नाही. अशा दुचाकींस्वारावर कारवाईत पोलिसांनी बुधवारी 17 हजार रुपये दंड वसूल तसेच 25 वाहने जप्त केली आहेत.

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्हय़ातील नागरिकांना अत्यावश्यक गोष्टी मिळाव्यात यासाठी सकाळी 9 ते 11 थोडी सवलत दिली आहे. मात्र ही सवलत म्हणजे कसेही फिरण्यास मुभा असल्यागत काही सातारकर दुचाकी, चारचाकी गाडय़ा घेवून फिरत आहेत. सर्वांना कारणाशिवाय बाहेर पडू नका अशी विनंती करुन देखील गंभीर नसलेल्या अशा 35 दुचाकीस्वारांवर पोलिसांनी कारवाई केली. यावेळी त्यांच्याकडून दंडात्मक कारवाईत 17 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

दरम्यान, नेहमीच कोणती ना कोणती कारणे देत फिरत असलेल्या वाहनधारकांवर कडक कारवाईचे धोरण अवलंबत सुमारे 25 वाहने जप्त करण्यात आली असून जिल्हाभरात जप्त केलेल्या वाहनांची संख्या आता हजारोंच्या घरात गेली आहे. मुळात रस्त्यावर कारणाशिवाय बाहेर पडू नका म्हणजे कारवाई होण्याचा वा करण्याचा प्रश्नच येणार नाही. ही सुशिक्षितांनी समजून घेण्याची गोष्ट असून सातारा जिल्हय़ाचा कोरोनाविरुध्दचा लढा जिंकायचा असेल तर घरीच बसा, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

या गाडय़ांना पेट्रोल मिळतेच कसे ?

दरम्यान, कोरोनाची संसर्ग साखळी तुटावी यासाठी पोलीस दल, आरोग्य विभाग कसोशीने प्रयत्न करत आहे. पेट्रोल पंपावर देखील अत्यावश्यक सेवा सोडली तर इतर कोणत्याही वाहनांना पेट्रोल, डिझेल दिले जात नाही. मग विनाकारण फिरणाऱया वाहनधारकांच्या गाडय़ात पेट्रोल येतेय तरी कोठून? असा सवाल प्रामाणिकपणे लॉकडाऊनचे नियम पाळत असलेल्या नागरिकांना पडला असून जर पेट्रोल, डिझेलचा असाही काळाबाजार सुरु असेल तर त्यावर कारवाईचा बडगा उगारा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Related Stories

कोल्हापूर : कागलमध्ये कोरोनामुळे एकाच दिवशी बाप-लेकाचा मृत्यू

Archana Banage

विधानसभेला 200 तर लोकसभेला 40 जागा जिंकू

datta jadhav

कोकण मार्गावर आणखी एक फेस्टिवल स्पेशल रेल्वे धावणार

Archana Banage

गडकरी धमकी प्रकरणातील तरुणी पोलिसांच्या ताब्यात

datta jadhav

देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र; केली ‘ही’ मागणी

Tousif Mujawar

महाराष्ट्रात सात रुग्णांमध्ये आढळला ‘डेल्टा-प्लस व्हेरिएंट’

Archana Banage