Tarun Bharat

साताऱयात पोलिसांचा कारवायांचा धडाका सुरुच

विनाकारण फिरणाऱया 33 जणांवर गुन्हे : दुचाकीही केल्या जप्त

प्रतिनिधी / सातारा

सातारा शहरात वाढत असलेली कोरोना बाधितांची वाढती संख्या रोखण्यासाठी काही दिवस तरी कडक लॉकडाऊन पाळण्याचा संदेश परिस्थिती देत आहे. त्यासाठी 10 पर्यंत कडक लॉकडाऊन करण्यात आला असला तरी काही सातरकरांच्या ते पचनी पडत नसल्याने लॉकडाऊनच्या दुसऱया दिवशी पोलिसांच्या कारवायांचा धडाका सुरुच राहिला.

   शाहूपुरी पोलीस ठाणे व सातारा शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱयांनी राजवाडा, मोती चौक, पोवईनाका, बाँबे रेस्टारंट परिसरात विनाकारण फिरणाऱयांची झाडाझडती सुरुच ठेवली आहे. बुधवारी देखील शहर व परिसरातील बंदोबस्तांच्या पॉईंटसवर पोलिसांनी 50 दुचाकी चालकांची तपासणी करुन कोणतेही कारण नसताना फिरणाऱया बेशिस्तांवर गुन्हे दाखल केले आहेत. तर काही दुकानदारांना अद्यापही गांभीर्य आलेले नाही अशा दुकाने उघडे टेवून बसलेल्या दुकानदारांवर देखील गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

   शहरातील विविध बंदोबस्ताच्या पॉईंटवर केलेल्या पोलिसांनी केलेल्या कारवाईत राहूल हरिश्चंद्र मोरे (वय 40, रा. गोडोली, सातारा), दिलीप नरसिंग बर्गे (वय 60, रा. करंजे, सातारा), मच्छिंद्र बाबूराव निकम (वय 26, रा. करंजे पेठ, सातारा), जाहीद गुलामसादिक मुजावर (वय 29, रा. मल्हारपेठ, सातारा), रमेश रेणवसिध्दी कांबळे (वय 40, भुर्के कॉलनी, सदरबझार, सातारा), साजिद मेहबूब शेख (वय 52, रा. गुरुवार पेठ, सातारा), रोहित लक्ष्मण यादव (रा. सातारा), अनिकेत सोमनाथ सोनावणे (वय 21, रा. शाहूपुरी), गुरुदत्त हणमंत पवार (वय 39, चैत्रबन अपार्टमेंट, गोडोली, सातारा, पतंगराव शंकर पोळ (वय 65, रा. एमआयडीसी, सातारा, शब्बीर कौशीखान पठाण (वय 44, रा. वनवासवाडी, खेड, सातारा), संदीप विजय शिंदे (वय 22 रा. देगाव, ता. सातारा), शाहरुख फारुख कुरेशी (वय 28, रा. मंगळवार पेठ, सातारा), प्रमोद सुधाकर वराटे (वय 65, रा. सदरबझार, सातारा), महेश नामदेव शेडगे (वय 40, रा. करंजेपेठ, सातारा), श्रावण एकनाथ घुटूगडे (वय 29, राधिका रोड, सातारा), चेतन निलकंठ, दिलीप भरत जाधव रा. संगममाहुली, ता. सातारा) यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेत.

तर गुरमितसिंग उधमसिंग लोहिया (वय 28, रा. धुमाळआळी, सातारा), सागर सतीश यादव (रा. रघुनाथपुरा, करंजे, सातारा), संदीप रामललित सहाणी, (रा. दौलतनगर, सातारा), मच्छिंद्र बाबूराव निकम (रा. करंजेपेठ, सातारा, जाहीद गुलाम सादिक मुजावर (रा. मल्हारपेठ, सातारा), मंगेश रविंद्र जाधव (रा. म्हसवे रोड, सातारा), श्रुतिका सदानंद घाडगे (रा. रविवार पेठ, सातारा), अनिकेत विलास बाबर (रा. करंजेपेठ, सातारा, पूनम संजय मोहिते (रा. दिव्यनगरी, ता. सातारा), नरेंद्र मारुती केंडे (रा. शाहूपुरी, सातारा), जयसिंग मारुती उंबरकर (रा. करंजे), सातारा, प्रशांत पांडुरंग देशमुख (रा. शाहूपुरी, सातारा), राजाराम बंडोपंत जाधव (रा. प्रतापगंज पेठ, सातारा), अंकिता कुशाल मोवरा (रा. राधिका चौक, सातारा, चंद्रकांत राजाराम काकडे (रा. गडकरआळी, सातारा), अभिजित गजान रोकडे (रा. मंगळवार पेठ, सातारा), अमृता सुनील झाड (रा. बुधवार पेठ, सातारा) या विनाकारण फिरणारांवर कारवाई केली असून यांच्यावर सातारा शहर तसेच शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

Related Stories

सातारकरांना कंकणकृती सूर्यग्रहणाचे ओझरते दर्शन

Patil_p

बाळासाहेब पाटील यांचा आज वाढदिवस

Patil_p

किरीट सोमय्या जाणार बुधवारी जरंडेश्वरवर

Patil_p

डबल सीटवर सातारा वाहतूक शाखेची कारवाई

Patil_p

फिटनेस सर्टीफिकेटसाठी जिल्हा रुग्णालयात गोंधळ

Patil_p

सातारा : मॉर्निंग वॉकला गेलेल्या युवकावर गुन्हा दाखल

Archana Banage