Tarun Bharat

साताऱयात फळविक्रेत्यांमध्ये राडा अन् तरुणांचा हैदोस

Advertisements

जिल्हा रुग्णालय व सेव्हन स्टार मॉल परिसरातील घटना ः  पोलीस कारवाई करणार काय?

प्रतिनिधी/ सातारा

सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या संरक्षक भिंतीच्या बाहेर दोन फळविक्रेत्यांमध्ये चांगलाच राडा झाला. ही माहिती कळाल्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनाही त्यांनी दमदाटी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली तर गेल्या कित्त्येक महिन्यांपासून सेव्हन स्ट्रार मॉल परिसरात तरूणांनी चांगलाच हैदोस घातला आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱया या तरूणांच्या टोळक्यांमध्ये दररोज वादावादीचे, हाणामारीचे प्रसंग घडत असल्याने येथील गाळेधारकांना चांगलीच डोकेदुखी ठरली आहे.

मंगळवारी गाडी लावण्याच्या कारणावरून दोन फळविक्रेत्यांमध्ये चांगलाच राडा झाला.  फळ विक्री एका मुलाला शेजारच्या गाडय़ावरील दोघांनी रस्त्यावर खाली पाडून अक्षरक्षः तुडवले. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आल्याचे पाहताच मार खालेल्या मुलाला चांगलेच बाळसे आले. तो त्याला मारणाऱया दोघांच्या अंगावर वजन घेवून धावून गेला. यावेळी त्याला आवरण्याचा प्रयत्न केला असता त्याने पोलिसांनाच दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराची घटनास्थळी चर्चा सुरू होती.

  दरम्यान, सेव्हन स्टार मॉल परिसरात तरूणांनी चांगलाच हैदोस घातला आहे. महाविद्यालयीन तरुणांच्या टोळक्यांमध्ये दररोज वादावादीचे, हाणामारीचे प्रसंग घडत असल्याने येथील गाळेधारकांना चांगलीच डोकेदुखी ठरली आहे. त्यामुळे या परिसरातील व्यावसयिकांना आता व्यवसाय करणेही अवघड जात आहे.

  ग्रामीण व शहरी भागातील हे विद्यार्थी सध्या कोरोनामुळे महाविद्यालये बंद असल्याने या सेव्हन स्ट्रार मॉल परिसरात अगदी सकाळपासून ठाण मांडून बसलेले असतात. त्यातच विविध कारणांमुळे यांच्यात वादावादीचे प्रकार घडतात. काहीवेळा हे वाद टोकाला जावुन काठय़ा व तलवारींने हाणामारी झाल्या आहेत. या टोळक्यांना कोणाचीच भिती सध्या उरलेली दिसत नाही. त्यामुळे यापरिसरातील अशा घटना थांबवण्यासाठी येथे पोलिसांची गस्त वाढविण्याची गरज आहे.

 असा प्रकार घडत असल्यास तक्रारी करा

पोलीस दलाकडून शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नेहमीच सतर्कता दाखवली जाते. पोलीस दलाचे शहरातील संवेदनशील भागावर कायम लक्ष असतेच. काही घटना समोर आली की कारवाई केली जाते. सेव्हन स्टार परिसरात देखील कारवाई करण्यात आलेली आहे. तरी देखील तरुणांच्या टोळक्याकडून असे काही प्रकार सुरु असतील तर संबंधितांनी पोलीस दलाकडे तक्रार करावा वा माहिती द्यावी. त्यांच्यावर कारवाई केली जाईल. सध्यातरी या भागात कोणतेही अनुचित प्रकार घडल्याचे नोंद नाही.

Related Stories

अत्यावश्यक सेवेतील शासकीय, निमशासकीय कर्मचार्‍यांना बसतोय जिल्हा प्रवेश बंदीचा फटका

Archana Banage

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनची ईडी कार्यालयात चौकशी

Archana Banage

पोलीसांची वाहनांवर कारवाई

Patil_p

स्वाभिमानीचे गांधी जयंतीला सत्याग्रह आंदोलन

datta jadhav

सांगलीच्या तरणजित धिल्लोची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड

Archana Banage

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा; उद्धव ठाकरेंच्या हस्ते भूमिपूजन

Archana Banage
error: Content is protected !!