Tarun Bharat

साताऱयात बंदला संमिश्र प्रतिसाद

प्रतिनिधी/ सातारा

मोदी हटाओ… देश बचाओ…,मोदी सरकारचा धिक्कार असो…, अशा घोषणा देत राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना यांनी राजधानी साताऱयात सोमवारी सकाळी मोर्चा काढून लखीमपूर घटनेचा तीव्र निषेध केला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्त्यावर ठिय्या मारुन जिल्हाधिकाऱयांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. दुकाने बंद करण्याचे आवाहन महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱयांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नेहमीप्रमाणे शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख नरेंद्र पाटील, राष्ट्रवादीचे दीपक पवार आणि रजनी पवारांनी तोफ थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तोफ डागली. दरम्यान, शिवसेनेचे शहरसंघटक प्रणव सावंत यांना एका सामाजिक कार्यकर्त्याने हुसकाल्याने रागाच्या भरात खुर्ची आपटली गेली परंतु खुर्ची मोडली नाही, असा दावा शिवसेनेचे उपशहरप्रमुख सचिन मोहिते यांनी केला आहे. दरम्यान, महाविकास आघाडीच्या आवाहनानंतर शहरातील व्यापाऱयांनी सकाळी दुकाने बंद ठेवली पण दुपारनंतर सर्व दुकाने सुरू झाल्याने शहरात वाहतुकीची कोंडी झाली होती. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी वाहतूक शाखेची क्रेन अक्षरशः शहरातून फिरत होती.

महाविकास आघाडीच्या मोर्चाला सकाळी 10 वाजता राजवाडय़ापासून सुरुवात झाली. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा समिंद्रा जाधव, राष्ट्रवादीचे युवकचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, युवती सेलच्या प्रदेश सरचिटणीस स्मिता देशमुख, युवती सेलच्या जिल्हाध्यक्षा पुजा काळे, नागेश साळुंखे, शफिक शेख, शशीकांत वाईकर, वैभव कणसे, निशा पाटील, शुभांगी निकम, संगीता साळुंखे, राधिक हंकारे. काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा धनश्री महाडिक, प्रदेश सरचिटणीस रजनी पवार, जिल्हा उपाध्यक्ष नंदाभाऊ जाधव, सुषमा राजेघोरपडे, माधुरी जाधव, डॉ. पल्लवी पाटोळे, नरेश देसाई, मनोजकुमार तपासे, नाना लोखंडे, अन्वर पाशा खान, अमोल शिंदे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव, माजी जिल्हा प्रमुख नरेंद्र पाटील, उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते, आतिष ननावरे, अनिल गुजर, रमेश बोराटे, प्रणव सावंत, अमोल गिरीगोसावी, निलेश मोरे, बाळासाहेब शिंदे, महिला संघटीका प्रतिभा शेलार, प्रशांत शेळके, सचिन जगताप, सागर साळुंखे, राहूल जाधव पदाधिकारी कार्यकर्ते सहभाग झाले होते.

 मोर्चाची सुरुवात राजवाडय़ापासून होवून मोती चौक मार्गे पाचशेएक पाटी, पोलीस मुख्यालयमार्गे पोवई नाका जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर तिन्ही पक्षांच्यावतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. तेथे जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात आले. यावेळी बोलताना नरेंद्र पाटील म्हणाले, लखीमपूर घटनेचा आम्ही निषेध देशातील कष्टकरी बांधव, सामान्य जनतेच्यावतीने करतो. यातील अपराध्यांना शासन झाले पाहिजे. केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा घेतला नाही तर हे आंदोलन तीव्र करु. देशातील सर्व जनतेला ही वाढती महागाई, शेतकऱयांचे कंबरडे मोडून काढणे, एकंदर या देशाची चाललेली लुट आहे ती रोखण्यासाठी सर्वांनी जागृत होवून रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे.

दीपक पवार म्हणाले, आठ शेतकऱयांच्या हत्त्येसंदर्भात आज महाराष्ट्रामध्ये आघाडी सरकारने बंद पुकारण्यात आला आहे. तो बंद पुर्णपणे यशस्वी झालेला आहे. आम्ही आघाडीच्या सर्व पक्षातील कार्यकर्ते एकत्र राहून गांधी मैदान ते कलेक्टर ऑफिस अशी रॅली काढण्यात आली आहे. आज आम्ही जिल्हाधिकाऱयांना निवेदन दिले असून या शासनाचा आम्ही धिक्कार करत आहोत. या शासनाने चालवलेली लुटमार बंद केली पाहिजे. आम्ही या शासनाचा निषेध करतो आहे.

रजनी पवार म्हणाल्या, मोदी सरकारने लखीमपूरची घटना घडवून आणली.  या घटनेचा आम्ही पूर्णपणे निषेध केलेला आहे. परंतु आमच्या नेत्या प्रियांका गांधी एक महिला असताना सुद्धा त्यांना कशाप्रकारे अटक केली. त्याचा आम्ही निषेध करतो.  

खुर्ची आपटली, मोडली नाही

शहर संघटक प्रणव सांवत यांनी खुर्ची आपटल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याबाबत शिवसेनचे उपजिल्हा प्रमुख सचिन मोहिते यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, खुर्ची तोडली वैगेरे काही नाही. एका सामाजिक कार्यकर्त्यांने शांततेत मोर्चा जात असताना कार्यकर्त्याला डिवचले गेले. त्यामुळे रागाच्या भरात खुर्ची आपटली गेली. परंतु प्रत्यक्षात खुर्ची मोडली किंवा तोडली नाही. चुकीचे वृत्त व्हायरल होत आहे, असा दावा त्यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना केला.

स्थानिक अधिकाऱयांच्यावतीने मज्जाव

शिवसेनेचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना याबाबत पत्रकारांनी छेडले असता साताऱयात खुर्ची आपटण्याचा प्रकार घडला. आमच्या पोलीस अधिकाऱयांनी लगेच मज्जाव केला आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्यात शांततेत मोर्चा काढण्याचे नियोजन होते. तरीही कोणी चुकीचे कृत्य करत असेल तर त्याची चौकशी करुन कारवाई करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली.

साताऱयातील व्यापाऱयांनी बंदला केला विरोध

साताऱयातील काही व्यापाऱयांनी उघडपणे बंदला विरोध केला. त्यामध्ये राजधानी टॉवरमधील गजेंद्र ढोणे यांनी स्वतःचे दुकान उघडे ठेवले. त्याबाबत ते मीडियाशी बोलताना म्हणाले, आम्ही लखीमपूर घटनेचा निषेध करतो. पण निषेध करत असताना बंद हे त्याच उत्तर नाही. बंद पाळला तर व्यापाऱयांचच फक्त नुकसान होत. ना कोणत्या राजकीय नेत्याच नुकसान होत नाही कोणत्या पक्षाच नुकसान होतं.बंद पाळताना फक्त आणि फक्त व्यापारीच पिळला जतो. अगोदरच कोरोना महामारीत सर्व व्यापाऱयांचे नुकसान झाले आहे. माझी सर्व पक्षीय महाविकास आघाडीला विनंती आहे की त्यांनी हा बंद मागे घ्यावा.दोन वर्षात व्यापाऱयांचे नुकसान झाले असून थकलेली वीज बिले, फोन बीले, त्यांच्या मुलांच्या शाळेच्या थकलेल्या फीज हे न भरुन येणारे नुकसान आहे. त्यातच व्यापाऱयांची पिळवणूक करु नका. अतिशय मार्केटमध्ये मंदी आहे. त्यामुळे या बंदचा मी निषेध करतो. मी स्वतः दुकान उघडतो. माझ्या दुकानाचे नुकसान झाल्यास महाविकास आघाडी जबाबदार राहतील, असेही त्यांनी सांगितले.

Related Stories

सातारा : बेड न मिळाल्याने कोरोनाबाधित महिलेवर रिक्षातच उपचार

datta jadhav

जिल्हा हादरला : एकाच दिवसात ५८ नवे रुग्ण

Archana Banage

सातारा पोलीस दलाची किल्ले वैराटगडावर स्वच्छता मोहिम

Patil_p

जिल्हा नियोजनवर नवे चेहरे

Patil_p

संक्रांतीला धूमस्टाईलने मंगळसूत्र हिसकावले

Patil_p

सातारा : नागठाणे ‘जनता कर्फ्यु’ला स्टील विक्री दुकानदारांकडून कोलदांडा ?

Archana Banage