Tarun Bharat

साताऱयात ’विनामास्क’ची कारवाई थंडावली

प्रतिनिधी/ सातारा

सातारा तालुक्यात गेल्या काही महिन्यापासून पडलेला हॉटस्पॉटचा शिक्का काही पुसला जात नाही. बाधित वाढ मंदावल्यानंतर देखील सातारा शहर व तालुक्यात दोन अंकी संख्येने वाढ सुरु असतानाच मंगळवारच्या अहवालात तब्बल 100 बाधित आढळून आल्याने खळबळ उडालीय. मात्र सध्या सातारा शहर व तालुक्यात मास्क नसल्यास होणारी कारवाईही थंडावली असून पोलीस, महसूल व पालिका प्रशासनाने झोपी गेल्याचे दिसून येत आहे.

कोरोनाविरुध्दचा लढा सुरु झाल्या त्या वर्ष पूर्ण झाले. गतवर्षी मार्च महिन्यात सातारा शहर व तालुक्यात बाधित आढळून आले नव्हते. खेड येथे आढळून आलेल्या एका बाधिताचे निधन झाले होते. तरी देखील सातारा शहर व तालुक्याने कडक लॉकडाऊन पाळत सातारा शहर व तालुका कोरोनापासून दूर ठेवला होता. अनलॉकनंतर मात्र सातारा तालुक्यात वाढता वाढता बाधितांची संख्या एवढी वाढली कराडलाही मागे टाकले आहे.

सध्या देखील सातारा हॉटस्पॉट ठरलेला असून येथे जिल्हा प्रशासनातील सर्व की पर्सन कार्यरत असताना सातारा शहरात होणारी रुग्ण वाढ रोखण्यासाठी नेमके काय उपाय केले जात आहेत हेच नागरिकांनाही माहिती नाही. मध्यंतरी मास्क नसलेल्यांवर कारवाई करण्यात येत होती. मात्र ती देखील थंडावली आहे. सोशल डिस्टनचा तर सातारा शहरात फज्जा उडवून टाकण्यात येत आहे. मंगळवारी एका दिवसात 100 बाधित समोर आल्यानंतर बुधवारी दिवसभर सातारा शहरात मास्क नसलेल्यांवर होणारी कारवाई थंडावल्याचे दिसून येत होते.

नगरपालिका तसेच पोलीस दलाकडून मास्क नसलेल्यांवर कारवाई करण्याचे काम सुरु होते. मात्र गेल्या काही दिवसात ही कारवाई गतीने होत होती. नागरिक देखील मास्क वापरतच आहेत. मात्र रस्त्यावर असलेली तरुणाई बेदरकार झाली असून विनामास्क हिंडताना दिसून देखील त्यांच्यावर कारवाईचा धाक दिसत नाही. एकीकडे सातारा शहर व तालुक्यात रुग्ण वाढ पाहता काही दिवसांसाठी पुन्हा नियम कडक करण्याची गरज व्यक्त आहे.

Related Stories

शिवसेनेचे ‘हिंदुत्व’ वंचितला मान्य, उद्धव ठाकरेंना पुन्हा युतीसाठी साद

datta jadhav

महाबळेश्वर पोलीस स्टेशनमध्ये 56गावांचा समावेश

Patil_p

दीपावलीनिमित्त किल्ले अजिंक्यतारावर गडपूजन उत्साहात

Archana Banage

सज्जनगडावर भगवा ध्वज फडकावून नव्या वर्षाचे स्वागत

datta jadhav

सातार्यात घर मालकानेच केला भाडेकरू विवाहितेवर बलात्कार

Archana Banage

सातारा : पांडे-खानापूर हद्दीलगत टाकलेल्या मळीने विहीरीचे पाणी होणार दुषीत

Archana Banage