Tarun Bharat

साताऱ्याच्या हिरकणी रायडरचा नांदेडमध्ये अपघाती मृत्यू

ऑनलाईन टीम / नांदेड :

साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन घेण्यासाठी निघालेल्या साताऱ्याच्या हिरकणी रायडर्स गुपमधील शुभांगी पवार (वय 32) यांचा आज सकाळी दहाच्या सुमारास अपघाती मृत्यू झाला. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील दाभड हद्दीत भोकरफाटा येथे ही दुर्घटना घडली.

साताऱ्यातील हिरकणी रायडर्स गुपच्या नऊ महिला सदस्य साडेतीन शक्तीपीठांच्या दर्शनासाठी 10 ऑक्टोबरला कोल्हापूरातून महालक्ष्मीचे दर्शन घेऊन निघाल्या. 1868 किमीचा हा प्रवास त्या बाईकने करत होत्या. कोल्हापूरनंतर तुळजापूर येथे त्यांनी भवानी मातेचे दर्शन घेऊन माहुर येथील रेणुका मातेच्या दर्शनासाठी त्या निघाल्या होत्या. दरम्यान, आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास हा ग्रुप अर्धापूर तालुक्यातील भोकरफाटा येथून जात असताना खराब रस्त्यामुळे शुभांगी पवार यांची बाईक स्लीप झाली अन् त्या रस्त्यावर कोसळल्या. त्याच क्षणी मागून येणाऱ्या टँकरचे चाक त्यांच्या डोक्यावरुन गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Related Stories

सातारा : जिल्हा आरोग्य अधिकारी पदी डॉ. राधाकिशन पवार

datta jadhav

साडे 31 लाखाची फसवणूक करणारा भामटा भुईंज पोलिसांनी केला जेरबंद

Archana Banage

सातारच्या कन्या वैशाली माने यांची पोलीस अधिक्षकपदी पदोन्नती

Patil_p

सातारा : आ. शिवेंद्रसिंहराजेंचे पुष्कर कोविड केअर सेंटर उद्यापासून सुरु

Archana Banage

पोलिसांनो हिम्मत असेल तर मटक्यावर धाड टाका

Patil_p

आमदार निलंबनावर सातारा जिल्हा भाजप आक्रमक

Patil_p