Tarun Bharat

साताऱ्यातील शिवस्मारकाचे काम रखडल्याने छावा आक्रमक

Advertisements

प्रतिनिधी / सातारा :

साताऱ्यातील पोवईनाक्यावर शिवतीर्थ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ा सभोवती असलेल्या शिवस्मारकाचे काम गेल्या कित्येक वर्षांपासून रखडवले आहे. याला हे काम घेतलेले ठेकेदार याला जबाबदार असून, त्यांनी आठ दिवसांच्या आत काम सुरु न केल्यास ठेकेदाराच्या तोंडास काळे फासण्याचा इशारा छावा क्षात्रवीर संघटनेने दिला आहे.

ग्रेड सेपरेटरच्या कामात शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या जुन्या स्मारकाची मोडतोड झाली. त्याचे सुशोभिकरण करण्यासाठी बांधकाम खात्याने तब्बल 50 लाख रुपयांची निविदा मंजूर केली आहे. ई टेंडरिंग पध्दतीने या कामाची निविदा छाबडा नामक बांधकाम ठेकेदारास मिळाली आहे. मात्र, संबंधित ठेकेदाराने हे काम सुरु करुन सध्या ते खूप दिवसांपासून अर्धवट स्थिती ठेवले आहे. संबंधित ठेकेदार हा मराठी नसल्याने त्याला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अस्मिता नसल्याने हा प्रकार घडत आहे. येत्या आठ दिवसात ठेकेदाराने शिवस्मारकाच्या कामाला गती दिली नाही तर संबंधित ठेकेदारासह बांधकाम विभागाच्या अभियंत्यांच्या तोंडाला काळे फासून निषेध व्यक्त केला जाईल, असा इशारा छावा क्षात्रवीर सेनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत सोनावणे, अरबाज शेख यांनी दिला निवेदनात दिला आहे.

Related Stories

येणकेतील बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश

datta jadhav

फेसबुकवरील फोटोद्वारे महिलांची बदनामी करणारा गजाआड

Archana Banage

रिक्षा चालकास लुटणारा जेरबंद

Patil_p

पोस्टल कुस्ती स्पर्धेत चंद्रशेखर शिंदे यांना कांस्यपदक

datta jadhav

अभियांत्रिकी प्रशासकीय सेवेत साताऱ्याच्या अम्रीता कायगुडे

datta jadhav

काँग्रेस कमिटीच्या इमारतीला 62 वर्षानंतर नवी झळाळी

Patil_p
error: Content is protected !!