Tarun Bharat

साताऱ्यात कोरोनामुक्तांची संख्या 700 च्या उंबरठय़ावर, तिघेजण बाधित

सातारा, प्रतिनिधी
फेब्रुवारी, मार्चपासून सुरु असलेल्या कोरोना विरुध्दच्या युध्दात जिल्हय़ाने अनेक चढउतार अनुभवले. मात्र सध्या कोरोना बाधितांचा आकडा 891 वर असला तरी 700 च्या उंबरठय़ावर उभी असलेली कोरोनामुक्तांची संख्या जिल्हावासीयांना दिलासा देत आहे. शुक्रवारी दहाजणांनी कोरोनावर मात करत लढा जिंकला त्यामुळे एकूण मुक्ताची संख्या 699 वर पोहोचली आहे. दिवसभरात तिघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून मोठ्या संख्येने बाधित न आढळल्याने दिलासा मिळाला आहे. तर 106 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सिक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील 10 जणांची कोरोनावर मात
विविध रुग्णालयात तसेच कोरोना केअर सेंटर्स मध्ये उपचार घेवून कोरोनातून बऱ्या झालेल्या 10 नागरिकांना आज 10 दिवसानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामध्ये सातारा तालुका व शहरातील तिघेजण एकाच दिवशी कोरणामुक्त झाले आहेत.

यामध्ये पाटण तालुक्यातील दिवशी बु. येथील 31 वर्षीय पुरुष. खटाव तालुक्यातील वडगाव येथील 57 वर्षीय महिला, सातारा तालुक्यातील क्षेत्रमाहूली येथील 50 वर्षीय पुरुष, पिंपळवाडी-धावडशी येथील 36 वर्षीय महिला, सातारा शहरातील रविवार पेठेतील 14 वर्षीय युवती. शाहूनगर (सातारा) येथील 50 वर्षीय पुरुष, 47 वर्षीय महिला व 15 वर्षीय युवती.
फलटण तालुक्यातील तांबवे येथील 40 वर्षीय पुरुष, वडले ता. 45 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.

3 नागरिकांचा अहवाल पॉझिटिव्ह
कराड कृष्णा मेडीकल कॉलेज येथे उपचार घेणाऱ्या 3 नागरिकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून झकोरोना बाधित रुग्णांमध्ये पाटण तालुक्यातील कुंभारगाव येथील 42 वर्षीय पुरुष, खटाव तालुक्यातील खटाव येथील 50 वर्षीय महिला व कराड तालुक्यातील खंडोबानगर, मलकापूर येथील 33 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

शेंदूरजणेच्या सारी बाधिताचा मृत्यू
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे वाई तालुक्यातील शेंदुरजणे येथील 62 वर्षीय पुरुषाला सारीची लक्षणे असल्याने दाखल केले होते. काल नमुना तपासणी करीता पुणे येथे पाठविण्यात आला होता, दरम्यान काल रात्री उपचार सुरु असताना मृत्यु झाला. त्याच्या अहवालाची प्रतिक्षा असून त्यानंतर तो कोरोना बाधित होता की नव्हता हे समोर येईल. दरम्यान काल रात्री पाटण तालुक्यातील सडा दाढोली येथील 70 वर्षीय बाधित पुरूषाचा मृत्यू झाला असून त्यामुळे एकूण मृतांची संख्या 42 वर गेली आहे.

106 जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह
गुरुवारी रात्री उशीरा एन. सी. सी. एस, पुणे व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड यांच्याकडून बाधितांच्या सहवासात आलेल्या 106 नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याचे डॉ. आमोद गडीकर यांनी सांगितले. अद्याप 287 अहवाल प्रलंबित असले तरी निगेटिव्ह अहवाल येणाऱयांची संख्या जास्त आहे. तर जिल्हय़ातील कोरोनामुक्तीची टक्केवारी देखील चांगली असली तर अधूनमधून येणारी बाधितांची संख्या जिल्हय़ात चिंतेचे वातावरण निर्माण करत आहे.

248 नागरिकांच्या घशातील नमुने तपासणीला
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 72, कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 32, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 55, उपजिल्हा रुग्णालय वाई येथील 7, ग्रामीण रुग्णालय कोरेगांव येथील 5, कोरोना केअर सेंटर शिरवळ येथील 7, रायगाव येथील 10, मायणी येथील 16, महाबळेश्वर येथील 5, दहिवडी येथील 39 अशा एकूण 248 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस.पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत.

आजपर्यंत 10 हजार 625 जणांचे अहवाल निगेटिव्ह
आजपर्यंत प्रवास करुन आलेले 2 हजार 120, बाधिताच्या निकट सहवासित 6 हजार 889 तर श्वसन संस्थेचा तीव्र जंतु संसर्ग सारीचे 654 तर एक हजार 462 आरोग्य सेवक व 771 गदोदर माता असे एकूण 11 हजार 896 जणांची तपासणी करण्यात आलेली असून यामध्ये 10 हजार 625 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत.

परवानगी घेवून लग्न समारंभ
50 लोकांच्या मर्यादित सहभागाने व कोरोना स्थितीतील सर्व नियम पाळून जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी लग्न समारंभास परवानगी दिली आहे. मात्र यासाठी अटी व शर्थी असून त्या त्या विभागातील तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांचा ना हरकत दाखला घेवून यापुढे लग्न समारंभ उरकता येणार असून ऍनलॉकच्या दिशेने जाताना हा आणखीन एक महत्वपूर्ण निर्णय झाला असला तरी काळजी घेवूनच आयुष्याच्या गाठी बांधाव्या लागणार आहेत.

ऍनलॉकच्या दिशेने जाताना काळजी हाच पर्याय
एकीकडे कोरोना बाधितांची संख्या वाढताना दुसरीकडे जिल्हय़ात कोरोनामुक्तीचा वेग दिलासादायक आहे. मात्र अधुनमधून वाढणारे बाधितांचे आकडे चिंता वाढवत आहेत. सगळय़ांची स्थिती गोंधळाची असली तरी भविष्यात वाटचाल करताना मास्क वापरण्याबरोबरच सामाजिक अंतर राखणे, सार्वजनिक वैयक्तिक स्वच्छता पाळणे या काळजी घेतच ऍनलॉकच्या दिशेने जावे लागणार असून यासाठी सामुहिक शिस्त पाळावीच लागेल.

शुक्रवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण बाधित 891
एकूण मुक्त 699
एकूण बळी 42

शुक्रवारी
एकूण बाधित 03
एकूण मुक्त 10
एकूण बळी 01

Related Stories

पंचगंगा नदीचे प्रदुषण रोखण्यासाठी एमपीसीबी आणि एमआयडीसी यांची समन्वय समिती

Archana Banage

सिव्हील हॉस्पिटलमध्ये थॅलेसेमिया रुग्णांचे हाल

datta jadhav

सातारा जिल्ह्यात 218 जण कोरोनामुक्त

Archana Banage

श्रीनगर येथे दहशतवाद्यांकडून ग्रेनेड हल्ला

Archana Banage

सांगली : कोकरुडमध्ये 5 रुग्ण सापडल्याने गाव सात दिवस बंद

Archana Banage

भाजपाने धनगर समाजाला फसवले – मंत्री मुश्रीफ

Archana Banage