Tarun Bharat

साताऱ्यात गर्भवती वनरक्षक महिलेसह पतीला माजी सरपंचाची बेदम मारहाण

Advertisements

सातारा / प्रतिनिधी : 

साताऱ्यात पळसवडे गावचे माजी सरपंच रामचंद्र जानकर यांनी महिला वनरक्षक सिंधू सानप आणि त्यांचे पती सूर्याजी ठोंबरे यांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही वनरक्षक महिला 3 महिन्यांची गर्भवती असून, त्यांच्या पोटात लाथा मारण्यात आल्या आहेत तर डोक्यात दगड देखील मारल्याने त्या रक्तबंबाळ झाल्या आहेत.

मला न विचारता मजूर दुसरीकडे का नेले या कारणातून चिडून वन समितीचे अध्यक्ष आणि पळसवडे गावचे माजी सरपंच रामचंद्र जानकर यांनी आणि त्यांची पत्नी प्रतिभा जानकर यांनी गर्भवती महिला वनरक्षक सानप यांना मारहाण केली आहे. मारहाण करणाऱ्या माजी सरपंचाविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या मारहाणीच्या घटनेने वनविभागात आणि जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात असून मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Related Stories

जिल्ह्यात 50 नवे बाधित

datta jadhav

शेतीपंपाच्या वीजबिलाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

datta jadhav

शहरातील वाहतूक व्यवस्थेसाठी बैठक संपन्न

Patil_p

लाचखोर पाटकऱयास चार वर्षे सक्तमजुरी

Patil_p

सातारा : शोरूम मधील दुचाकी चोरी प्रकरणी एकास अटक

Archana Banage

झेडपीच्या शाळेची पोरं शिकणार स्मार्ट टीव्हीवर

datta jadhav
error: Content is protected !!