Tarun Bharat

साताऱ्यात दोन फ्लॅट फोडले; 1.94 लाखांचा ऐवज लंपास

प्रतिनिधी / सातारा :

सातारा शहरातील गोडोली परिसरात असणाऱ्या साईमंगल अपार्टमेंटमधील दोन फ्लॅट फोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 1 लाख 94 हजार 200 रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 1 रोजी दुपारी सव्वादोन ते रात्री 7.30 दरम्यान ही घटना घडली आहे. यामध्ये गोडोलीतील साईमंगल अपार्टमेंटमधील वैभव अनिल मस्के यांचा फ्लॅट क्रमांक 6 व प्रज्ञा भगवानराव सपाटे यांचा तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक 11 मध्ये ही घरफोडी झाली. या बंद फ्लॅटच्या दरवाजांची कुलपे तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. या दोन्ही फ्लॅटमधून सोन्याचांदीचे दागिने, रोख रक्कम असा एकूण 1 लाख 92 हजार 200 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहेत.

Related Stories

सातारा : महिला वर्गाला गौरीच्या आगमनाचे वेध

Archana Banage

सातारा : शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेव यात्रा रद्द

datta jadhav

उत्तर खटाव, पुसेगाव भागात लसीकरणाला ब्रेक

datta jadhav

मराठय़ांचा अंत पाहू नका, उद्रेक होईल

Amit Kulkarni

सातारा : लॉकडाऊनमध्ये वाढतोय पोटदुखीचा त्रास,25 ते 50 वयोगटांना अधिक त्रास

Archana Banage

अतिदक्षता विभागात आवश्यक औषधांसह अन्य बाबींवर निधी खर्च करण्याचा निर्णय

Patil_p
error: Content is protected !!