Tarun Bharat

साताऱ्यात पाच जण कोरोना मुक्त

127 जणांचा अहवाल निगेटिव्ह तर 83 जण विलगीकरण कक्षात

प्रतिनिधी / सातारा

वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील एका आरोग्य कर्मचारी जे क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत होती, सह्यादी रुग्णालय, कराड येथील 2, यांचे निगेटिव्ह रिपोर्ट आल्यामुळे आज सोडण्यात आले व क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 2 असे एकूण 5 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने या सर्वांना रुग्णालयातुन आज सोडण्यात आले. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

127 जणांचा अहवाल निगेटिव्ह

तसेच क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 52, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 64 असे एकूण 116 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचे बी. जे. वैद्य’कीय महाविद्यालय , पुणे यांनी कळविले आहे. तसेच कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे तपासणी करण्यात आलेल्या 11 संशयितांचे नमुने निगेटिव्ह आल्याचे कळविले आहे, असे एकूण 127 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

83 जण विलगीकरण कक्षात दाखल

क्रातीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 8, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथे 75 असे एकूण 83 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली.

Related Stories

फेसबुकवरील प्रेमाची वरात…मुंबई पोलिसांच्या दारात

Patil_p

मंत्री मुश्रीफांचे येत्या आठवडय़ातील सर्व कार्यक्रम रद्द

Archana Banage

संचारबंदीच्या काळात ज्येष्ठ नागरिकांना व दिव्यांगांना सुविधा पुरविण्यासाठी नोडल अधिकारी नियुक्त

Archana Banage

स्टेट बँकेच्या 5 एटीएममधून सव्वा दोन लाख लंपास

Omkar B

भांडुपमधील रुग्णालयाच्या आगीची देवेंद्र फडणवीसांकडून पाहणी

Archana Banage

पालिकेला कर्मचाऱयांचा सत्कार करण्याचा विसर

Patil_p