Tarun Bharat

साताऱ्यात 1 ते 31 डिसेंबर कालावधीत क्षय रोग आणि कुष्ठ रोग रुग्ण शोध मोहिम

Advertisements

लोकप्रतिनिधींसह नागरिकांचा सहभाग घेऊन मोहिम प्रभावीपणे राबवावी- पालकमंत्री बाळासाहेब पाटील

सातारा / प्रतिनिधी :

समाजातील कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोधण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत संयुक्त सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम व कुष्ठरुग्ण शोध अभियान राज्यामध्ये दि. 1 ते 31 डिरोंबर 2020 याकालावधीत राबविण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिल्या आहेत. त्यांच्या सुचनेप्रमाणे कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोध मोहिमेत लोकप्रतिनधींसह व नागरिकांचा सहभाग घेऊन ही मोहिम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावी, असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.


या विषयी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांच्याकडून रुग्णांचे लवकर निदानासाठी विविध उपाययोजना सुचविल्या आहेत. रोगशास्त्रीय अभ्यासानुसार दोन्ही आजारांचे रुग्ण निदान व उपचारापासून वंचित राहिल्यास रुग्णांना या रोगापासून निर्माण होणाऱ्या गुंतागुंतीचा सामना करावा लागतो व सहवासातील इतर लोकांनाही या रोगांची लागण होण्याचा धोका संभवतो. म्हणून समाजातील सर्व क्षयरुग्ण व कुष्ठरुग्णांचा शोध घेऊन लवकरात लवकर निदाननिश्चिती नंतर औषधोपचार सुरु करणे अत्यंत महत्वाचे आहे. यासाठी सामाजातील कुष्ठ रुग्ण व क्षय रुग्ण शोधण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत संयुक्त सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम व कुष्ठरुग्ण शोध अभियान राज्यामध्ये 1 ते 31 डिरोंबर 2020 याकालावधीत राबविण्यात येणार आहे.


या मोहिमेसाठी समाजाचा लोकसहभाग महत्वाचा असून, यासाठी आपल्या जिल्ह्यातील खासदार, आमदार व इतर लोक प्रतिनिधी या अभियानामध्ये सक्रिय सहभागी होतील यासाठी प्रयत्न करावेत. या सर्वांच्या सहभागामुळे सक्रिय क्षयरुगण शोध मोहिम व कुष्ठरुग्ण शोध अभियान मोहिम यशस्वी होईल, असा विश्वासही पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Related Stories

जिह्यातील सतरा पोलीस झाले फौजदार

Omkar B

सातारा : वेचले येथील उपकेंद्रात लसीकरणास प्रारंभ

datta jadhav

महाबळेश्वर तालुक्यातुन प्रथमच शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्याने समाजकार्य विषयातील पीएचडी पदवी मिळवली

Abhijeet Shinde

संजय धुमाळांवर विनयभंगाचा गुन्हा

Patil_p

फडणवीस सरकार चालवतात अन् बाकीचे मंत्री फक्त बारशासाठीच

Patil_p

मटका खुलेआम; कारवाई फक्त जुगार अड्डयांवरच

datta jadhav
error: Content is protected !!