Tarun Bharat

साताऱ्यात 78 बेडची उभारणी

Advertisements

पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडून जागेची पाहणी

सातारा : जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचे  रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा क्रिडा संकुलात 78 नवीन बेडची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे, त्याची पाहणी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज केली. तत्पूर्वी प्रशासनामार्फत करण्यात येणाऱ्या उपायोजना व रुग्णांवरील उपचारांबाबत पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आढावा घेतला. 

या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, नगर प्रशासन अधिकारी अभिजीत बापट यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीमध्ये ऑक्सिजन बेड तसेच आयसीयु बेड  वाढवण्याच्या सूचना करुन पालकमंत्री पाटील यांनी जिल्ह्यामध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्धतेची माहिती  घेवून Break the chain अंतर्गत जे निर्बंध घातले आहेत त्याची जिल्ह्यात कडक अंमलबजाणी करा, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

दरम्यान, जिल्हा कोविड सेंटरमध्येही आणखी 20 आयसीयु बेडची नव्याने निर्मिती करण्यात येणार आहे. 

Related Stories

मी प्युअर मराठा

datta jadhav

राष्ट्रवादीने केला इंधन दरवाढीचा निषेध

Abhijeet Shinde

पालिका निवडणुकीत शिवसेनाही घेणार उडी

datta jadhav

आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज रहावे –

Patil_p

एका मिनिटांत मारले 100 पुशअप्स

Patil_p

पालिकेच्या सभांनाच नगरसेवकांचीच गैरहजेरी

Patil_p
error: Content is protected !!