Tarun Bharat

साताऱ्यात RT-PCR चे बनावट रिपोर्ट

Advertisements

ऑनलाईन टीम / सातारा : 

साताऱ्यातील क्रांतीसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालयात कोरोनाची RT-PCR टेस्ट केल्याचा बनावट रिपोर्ट काही जणांनी मिळवला आहे. याप्रकरणी रुग्णालयाचे डॉ. ज्ञानेश्वर हिरास यांच्या तक्रारीवरुन पाच संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

महेश रामचंद्र जाधव (अंबवडे, ता. सातारा), हरिदास नाथा कुंभार (नागझरी, ता. कोरेगाव), प्रमोद आनंदराव माने (रा. कुमठे ता. सातारा), अजय संजय डुबल (शिवाजीनगर) आणि गणेश प्रकाश घोरपडे (निसराळे ता. सातारा) अशी गुन्हा दाखल केलेल्या संशयितांची नावे आहेत.    

मिळालेल्या माहितीनुसार, वरील पाच संशयितांनी 14 आणि 15 ऑक्टोबर 2020 या दोन दिवसात क्रांतीसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालयात कोरोनाची RT-PCR टेस्ट केल्याचा बनावट रिपोर्ट मिळवला. मात्र, शासकीय रुग्णालयात  या संशयितांनी ही टेस्ट केल्याची नोंद नव्हती. त्यामुळे या प्रकरणाची प्रशासनाकडून सखोल चौकशी करण्यात आली. त्यामध्ये हे रिपोर्ट बनावट असल्याचे समोर आले.

Related Stories

सातारा : वर्णे-आबापुरी यात्रा रद्द

datta jadhav

कराडजवळ भीषण अपघातात पुण्याचे दोन ठार

Patil_p

जनावरांची अवैध वाहतूक करणारा टेम्पो उलटला

Amit Kulkarni

पालकमंत्र्यांच्या तत्परतेची जिल्हय़ाला प्रचिती

Patil_p

कोरेगावचा वाघा घेवडा पोस्टाच्या तिकिटावर

datta jadhav

प्रजासत्ताक दिनी साताऱ्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

Archana Banage
error: Content is protected !!