Tarun Bharat

सातेरी क्रिकेटर्स उपान्त्य फेरीत

क्रीडा प्रतिनिधी /मडगांव

युनायटेड पणजीकर स्पोर्ट्स क्लबने आयोजित केलेल्या भव्य रकमेच्या क्रिकेट स्पर्धेत सातेरी क्रिकेटर्स संघाने उपान्त्य फेरीत प्रवेश मिळविला. या स्पर्धेचे आयोजन सागच्या कांपाल मैदानावर करण्यात येत असून यातील विजेत्या संघाला रोख 1,11,111 व चषक तर उपविजेत्या संघाला रोख 55,555 व चषक देण्यात येईल.

काल खेळविण्यात आलेल्या उपान्त्यपूर्व फेरीतील लढतीत कुडचडेच्या सातेरी क्रिकेटर्स संघाने वास्कोच्या आशा क्रिकेटर्स संघाचा 74 धावानी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना सातेरी क्रिकेटर्स संघाने आपल्या डावात 8 षटकात 7 बाद 101 धावा केल्या. त्यांच्या संजय नाईकने 28, पुष्पशील देसाईने 13 चेंडूत 35 तर मयुर व सूरजने प्रत्येकी 12 धावा केल्या. आशा क्रिकेटर्सच्या सतीश यादवने 22 धावात 2, गौरेश यादवने 14 धावात 2 तर लल्ला यादव व राजन सिंगने प्रत्येकी एक गडी बाद केला.

त्यानंतर सातेरी क्रिकेटर्स संघाच्या गोलंदाजांनी आशा क्रिकेटर्स संघाला 6.5 षटकात केवळ 27 धावात उखडले. आशा क्रिकेटर्सं संघाच्या आसिफ शिंगनगूटीने 11 तर यासिन शिंगनगूटीने 8 धावा केल्या. सातेरी क्रिकेटर्स संघासाठी रुद्रेश नाईकने 7 धावात 3, प्रजेश नाईकने 10 धावात 2, पुष्पशील देसाईने 2 धावात 2 तर सनील सावंत व संचय नाईकने प्रत्येकी एक गडी बाद केला. अष्टपैलू कामगिरी केलेल्या सातेरी क्रिकेटर्सच्या पुष्पशील देसाईला सामनावीराचा पुरस्कार प्राप्त झाला.

Related Stories

प्रो. फुटबॉलमध्ये साळगावकरचा पहिला पराभव;पणजी फुटबॉलर्स विजयी

Patil_p

विविध देवस्थाने मुलांना घडवितात

Amit Kulkarni

कठोर कार्यवाहीसाठी आता मंत्र्यांवर जबाबदारी

Patil_p

अडीच किलो गांजा प्रकरणी आरोपीला पोलीस कोठडी

Patil_p

देवळाय ते आखाडा… पांडुरंगाची वारी!

Amit Kulkarni

राजकीय प्रवासात मगो पक्षाची नितीमुल्ये जपली

Amit Kulkarni