Tarun Bharat

सात जणांच्या चोरट्यांच्या टोळीला भुदरगड पोलीसांनी मोठ्या शिताफीने अटक

गारगोटी : प्रतिनिधी

नवले येथे गाडी अडवून प्रवाशांना जोरदार मारहाण करून चेन हिसकावून पलायन करणार्‍या सात जणांच्या चोरट्यांच्या टोळीला भुदरगड पोलीसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. या प्रकरणी भुदरगड पोलिसात अहमदनगर जिल्हयातील राहुरी तालुक्यातील सहा जणावर बुधवारी मध्यरात्री गुन्हा दाखल झाला आहे.

बाळकृष्ण शामराव पाटील (मुरूडे, ता. आजरा) व त्यांचा मित्र कडगाव येथून आपल्या मुरूडे गावी चारचाकी इरटीगा गाडीने सायंकाळी 7 वा. दरम्यान जात होते. या दरम्यान गोवा येथून राहुरी तालुक्यातील मध्यधुंद युवक आपल्या काळ्या रंगाच्या स्कार्पीओ (एमएच-16, सीक्यु 0104) गाडीतून गारगोटीच्या दिशेने येत होते. यावेळी नवले येथे राहुरीच्या मध्यधुंद चोरट्यांनी इरटीगा गाडीतील प्रवाशांची लुट करण्याच्या इराद्याने इरटीगा गाडी अडवून बाळकृष्ण पाटील व त्याचा मित्रास जोरदार मारहाण केली. यावेळी बाळकृष्ण यांच्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची चेन मिलींद दत्तात्रय हरीषचंद्रे (वय-23, रा. खंडबे बुद्रुक, ता. राहुरी) यांने मारून लांबवली व स्कार्पीओ गाडीतील सर्व युवकांनी पलायन केले.

फिर्यादी बाळकृष्ण पाटील याने तातडींने भुदरगड पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती दिली तसेच स्कार्फीओ गाडीचा पाठलाग सुरु ठेवला. भुदरगड पोलीसांनी तातडीने पोलीस यंत्रणा सतर्क करून सर्वत्र नाकाबंदी केली व नवले गारगोटी मार्गावरील सर्व पोलीस पाटील यांना माहिती देऊन टेहाळणी करण्यास सांगितले. स्कार्पीओ गाडी गारगोटीच्या दिशेने येत असल्याचे समजताच पोलीस कॉन्स्टेबल विक्रम चौत्रे, श्रीकांत चौगले, सुशांत कांबळे, बाळासो परीट, रोहित टिपुगडे यांनी स्कार्पीओ अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र मध्यधुंद चोरट्यांनी पोलीसांना चकावा देऊन गाडी पुढेच दामटली. गारगोटी बसस्थानकासमोरील क्रांती हॉटेल समोरील रस्त्यावर ट्रॉलीसह ट्रॅक्टर अडवा लावून रस्ता रोखून धरला व चोरटयांना स्कार्पीओ गाडीसह मोठ्या शिताफीने पकडले.

याप्रकरणी समीर सुरेश पारखे (वय-23 रा, धामोरे खुर्द), मिलींद दत्तात्रय हरीषचंद्रे (वय-23 खंडबे बुद्रुक), प्रतिक अर्जुन लटके (वय-23), सोमेश्‍वर प्रकाश हरीषचंद्रे (वय-25 ) अभिमन्यू भागवत पवार(वय-23 रा. खंडबे खुर्द), महेश परसराम कल्हापुरे (वय-23, रा. वांबोरी ) सर्व अहमनगर जिल्हातील राहुरी तालक्यातील आहेत. या सहा जणावर पोलीसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्या सहा जणांना न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.

Related Stories

अजून ग्रहण सुटलेले नाही

Omkar B

अमेरिकेत 20 लाखांहून अधिक कोरोनाबाधित

datta jadhav

‘अग्निपथ’च्या विरोधातील हिंसाचार राजकीय हेतूने – चंद्रकांत पाटील

Archana Banage

कोरोनामुळे यूपीएससी पूर्वपरीक्षा पुढे ढकलली 

Tousif Mujawar

पीएम मोदींनी ‘मन की बात’मधून साधला महाराष्ट्रातील डॉ. शंशाक जोशी यांच्याशी संवाद

Archana Banage

झिंगझींग झिंगाट मंत्रालयातच चालू असेल, तर मग हे शुद्धीत कसे असणार? ; नितेश राणेंचा सवाल

Archana Banage