Tarun Bharat

सात-बारा उतारा केंद बंद

Advertisements

नुकसानग्रस्त शेतकऱयांची गैरसोय : केंद्र सुरू करण्याची मागणी

प्रतिनिधी /बेळगाव

तहसीलदार कार्यालयातील उतारा केंद्र मागील दोन दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांना उताऱयासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. तहसीलदार कार्यालयात दोन ठिकाणी उतारा केंदे आहेत. या ठिकाणी सात-बारा उतारा दिला जातो. मात्र यातील एक केंद तांत्रिक अडचण पुढे करून बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.

अवकाळी पावसामुळे शेतकऱयांना मोठा फटका बसला आहे. नुकसानभरपाई मिळविण्यासाठी सात-बारा उतारा आवश्यक आहे. मात्र उतारा केंद बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. सात-बारा मिळविण्यासाठी शेतकऱयांना तहसीलदार कार्यालयाच्या पायऱया झिजवाव्या लागत आहेत. शासकीय कागदपत्रे वेळेत मिळावीत यासाठी शासनाने उचगाव, काकती, सांबरा, एपीएमसी आदी ठिकाणी जनस्नेही केंदे सुरू केली आहेत. मात्र ही केंदे सातत्याने बंद राहत असल्याने नागरिकांना बेळगाव येथील तहसीलदार कार्यालय गाठावे लागत आहे. त्यामुळे वेळ आणि आर्थिक भुर्दंडही बसत आहे. त्यामुळे सर्व जनस्नेही केंदे सुरळीत सुरू करावीत, अशी मागणी होत आहे.

शेतकऱयांना विविध योजनांबरोबरच नुकसानभरपाई मिळविण्यासाठी सात-बारा महत्त्वाचा आहे. मात्र वेळेत मिळत नसल्याने शेतकऱयांची ससेहोलपट होताना दिसत आहे. काही केंद्रांवर नागरिकांची गर्दी होत असल्याने शेतकऱयांना उतारा मिळविण्यासाठी दुसऱया दिवशी परत फेऱया माराव्या लागत आहेत. एकीकडे शेतीपिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे तर दुसरीकडे सात-बारा वेळेत मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

Related Stories

एचआयव्ही बाधितांच्या मदतीसाठी पाठपुरावा करू

Omkar B

गॅसवाहिन्या-जलवाहिन्या एकाचवेळी घालण्यासाठी समन्वयाची गरज

Patil_p

भांदूर गल्लीतील सांडपाणी विहिरीमध्ये

Amit Kulkarni

चोरी प्रकरणाचा चार दिवसात छडा

Amit Kulkarni

ऑनलाईन बसपास प्रक्रिया विद्यार्थ्यांना ठरतेय डोकेदुखी

Omkar B

लस मिळविण्यासाठी उचगावात अरेरावी

Omkar B
error: Content is protected !!